Home शहरे पुणे प्रभागातील वीज बाबत असलेल्या समस्या लवकरात लवकर मार्गी लावु – नगरसेवक अॅड.हाजी गफुर पठाण

प्रभागातील वीज बाबत असलेल्या समस्या लवकरात लवकर मार्गी लावु – नगरसेवक अॅड.हाजी गफुर पठाण

पुणे-परवेज शेख
गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या प्रभाग क्र २७,कोंढवा खुर्द-मिठानगर मध्ये सुरू असलेल्या वीजपुरवठाच्या समस्याबाबत नगरसेवक अॅड.हाजी गफुर पठाण यांनी दिंनाक २७|०७|२०१९ रोजी प्रभागातील नागरिकांना आंदोलनासाठी एकत्रित येण्याचे आवाहन केले होते.परंतु वानवडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी क्रांतीकुमार पाटील यांनी आमच्याशी संपर्क साधून वीजमंडळाच्या,अधिकारी सोबत माझ्या कार्यालयात चर्चा करून विजेचे प्रश्न सोडवण्याबाबत सुचना करु असे आवाहन केले.याप्रमाणे आज दि.२९।०७।२०१९ रोजी वानवडी पोलिस स्टेशन येथे नगरसेवक अॅड.हाजी गफुर पठाण,स्वीकृत नगरसेविका हसिना इनामदार,इम्तियाज शेख,मुनाफ मामु,मेहबूब भाई,रशिद इनामदार,समीर पठाण,जावेद पठाण,समीर बागवान,अनिस पिंजारी,असरार सय्यद व संबंधित अधिकारी उपस्थित होते.आपल्या प्रभागातील वीज बाबत असलेल्या समस्या लवकरात लवकर मार्गी लावुन,विजेच्या पुरवठ्यामध्ये सुधारणा होण्यासाठी प्राधान्य देवु असे आश्वासन संबंधित अधिकारी यांनी दिले.