पुणे जिल्हा आणि पुणे शहर बरोबरच पिंपरी चिंचवड आयुक्तालयात पी ४ हा उपक्रम यशस्वीरित्या राबवणार आहे. पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत येथील सुरक्षा रक्षक सेवा पुरवठादार संस्थेचे शेकडो हून मालक आणि चालक खाजगी सुरक्षा पुरवण्याचे काम करतात त्यांना सोबत घेऊन खूप वेगाने वाढणारी लोकवस्ती, विविध प्रकल्प, विकासाच्या दिशेने वाढणारे शहर इ तसेच आय. टी. कंपन्या, मेट्रो, स्मार्ट सिटी होत असतानाच अद्ययावत अशा प्रशिक्षित सुरक्षा रक्षकांना पोलिसांशी मैत्रीचे संबंध तयार करून एक आदर्श सुरक्षा प्रणाली विकसित होणे गरजेचे आहे म्हणून पुणे शहर पोलीस व खाजगी सुरक्षा रक्षक संस्था यांचे संयुक्त विद्यमाने पोलीस प्रायव्हेट सिक्युरिटी पार्टनरशीप प्रोग्रॅम पी-४ हा उपक्रम पोलीस आयुक्तालयात सर्व सुरक्षा एजेन्सीच्या मालकांनासोबत घेऊन राबवणार आहे.
पी-४ उपक्रमामुळे गुन्ह्याचे प्रमाण रोखण्यास मदत होईल आणि वेळोवेळी पोलीस प्रशासनाला मनुष्यबळ गरजेच्या वेळी सुरक्षा रक्षक संस्थेची मदत घेतली जाईल .

त्याच्या रक्षकांना योग्य ते प्रशिक्षण व सवांद आणि मार्गदर्शनाची गरज आहे.
सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व खाजगी सुरक्षेची माहिती घेऊन २०,००० पेक्षा जास्त खाजगी सुरक्षा कर्मचाऱ्यांना पोलीस ठाण्याशी जोडून अधिक सखोल पणे पसारा २००५ नुसार कामकाज करून घेणार आहे असे पोलीस सह आयुक्तांनी सांगितले.
या प्रसंगी मे. जी.१.एस सिक्युर सोल्युशन प्रा. ली. रहाटणी,मे. परफेक्ट सर्व्हिसेस प्रोप्रटी सोल्युशन वाकड,मे. रिलायबल एच आर फॅसिलिटी प्रा. लि. दिघी,मे. भारत शिल्ड फोर्स प्रा. ली. हडपसर,मे. एस एम ग्रुप मारुंजी-मुळशी,मे. देविका फॅसिलिटीज प्रा. ली. देहूगाव,मे. प्रोटेक्ट शिल्ड फोर्स पिंपरी चिंचवड,मे. बालाजी सिक्युरिटी फोर्स, आळंदी, मे. स्वामी ओम सिक्युरिटी सर्व्हिसेस कात्रज,मे. एम सिक्युरिटीज् मानकर चौक,मे. हाय अलर्ट सिक्युरिटी सर्व्हिसेस अँड एन्टरप्रायझेस आळंदी,भोसले सेक्युरिटी एजेन्सी इ.एजेन्सीचे मालकांनी निवेदन दिले.
पी-४ चे मुख्य समन्वयक सचिन मोरे यांनी मा.रामनाथ पोकळे साहेबांचे विशेष आभार मानले.
























WhatsApp