Home शहरे बीड प्रा. डॉ. चत्रभुज कदम यांच्या ‘सण- उत्सवाची गाणी’ या पुस्तकाची संदर्भग्रंथ म्हणून निवड

प्रा. डॉ. चत्रभुज कदम यांच्या ‘सण- उत्सवाची गाणी’ या पुस्तकाची संदर्भग्रंथ म्हणून निवड

प्रा. डॉ.चत्रभुज कदम हे साळेगाव तालुका माजलगाव येथील असून सध्या ते मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे शिवछत्रपती महाविद्यालय औरंगाबाद येथे मराठी विभागात कार्यरत आहेत.
त्यांच्या ‘सण – उत्सवाची गाणी’या संपादित पुस्तकाची स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांनी एम. ए.मराठी विषयाच्या ‘लोकसाहित्य’ या अभ्यास पत्रिकेसाठी संदर्भग्रंथ म्हणून निवड केली आहे.
त्याबद्दल मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.श्री प्रकाश (दादा) सोळंके, सरचिटणीस सतीश (भाऊ) चव्हाण, श्री प्रदीप (भाऊ) चव्हाण, श्री अभिजीत आवरगावकर, जयसिंग (भैय्या) सोळंके, श्री चंद्रकांत शेजुळ, प्राचार्य पी.व्ही.आष्टेकर, उपप्राचार्य पी.बी. नल्ले, प्राचार्य भरत वहाटुळे आदिंनी अभिनंदन केले.