मुंबई: मराठी मालिकासृष्टीत सध्या मोठ्या घडामोडी घडताना दिसून येत आहेत. अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. तर, प्रेक्षकांच्या काही आवडत्या मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत.
प्रेक्षकांचे दोन लाडके कलाकार उमेश कामत आणि मुक्ता बर्वे तब्बल आठ वर्षांनंतर एकत्र काम करणार आहेत. छोट्या पडद्यावरील ‘अजूनही बरसात आहे’ या नव्या मालिकेत ते एकत्र दिसणार आहेत. त्यामुळं एक जुनी मालिका आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. ‘श्रीमंताघरची सून’ ही मालिका आता संपणार आहे. मालिकेतील अभिनेत्री रुपल नंद हिनं चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना यावर शिक्कामोर्तब केलं आहे.
मराठी मालिकांमध्ये सुरू आहे लगीनघाईच; शंतनू-शर्वरी लग्नगाठ बांधणाणार
अजूनही बरसात आहे
सहजसुंदर अभिनयामुळे मुक्ता घराघरांत पोहोचली. उमेश तर तरुणींच्या गळ्यातला ताईतच. चित्रपटांबरोबरच नाटक माध्यमातूनही उमेश आणि मुक्ता प्रेक्षकांच्या आजवर भेटीला आले आहेत. पण, आता त्या दोघांची केमिस्ट्री छोट्या पडद्यावर अनुभवता येणार आहे. मुक्ता आणि उमेश यांनी ‘लग्न पाहावं करून’ या चित्रपटात यापूर्वी एकत्र काम केलं होतं. त्यांनतर आता तब्बल आठ वर्षांनी ही जोडी पुन्हा एकदा अजूनही बरसात आहे’ या मालिकेतून पाहायला मिळणार आहे.
मराठी मालिकांमधील कलाकार गोवा आणि दमणमध्ये; अशी आहे शूटिंग आणि राहण्याची व्यवस्था
Source link