Home ताज्या बातम्या फटाके वाजविताना घ्या काळजी!

फटाके वाजविताना घ्या काळजी!

0

फटाके वाजविताना घ्या काळजी!

दिवाळीचा आनंद द्विगुणीत करायचा म्हणजे फटाक्यांची आतषबाजी आलीच. मात्र तुमची हि दिवाळी आनंदी आणि सुरक्षित व्हावी, यासाठी काही काळजी घेतली पाहिजे. याबाबत जाणून घेऊ…     

● फटाके उडवितांना सुती कपडे वापरावेत. कारण ते लवकर पेट घेत नाहीत.
● फटाके उडविण्यासाठी शक्यतो मोकळ्या जागेचा वापर करावा.
● गाड्यांजवळ फटाके उडवू नका. कारण गाड्यांजवळ ऑईल, पेट्रोल सांडलेले असते. हे लगेच पेट घेऊ शकतात.
● मोठा आवाज होणाऱ्या फटाक्यांपेक्षा शोभेचे आणि आकाश उजळून टाकणारे फटाके वापरावेत.
● सुरसुऱ्या, फुलभाज्या विझल्यानंतर त्या पाण्यात टाकाव्या. त्या कुठेही टाकल्यास कुणाचा  पाय पडून भाजण्याची शक्यता असते. 
● विजेच्या डिपीजवळ फटाके वाजविणे टाळावे. 
● लहान मुलांनी मोठ्यांच्या सोबतीनेच फटाके वाजवावेत. 
● स्वत:ची संशोधन क्षमता नवे फटाके घरी तयार करण्यासाठी वापरू नये.

👀 *दुर्घटना घडल्यास ‘हे’ करा!* :

● भाजलेल्या भागाचा त्रास कमी होईपर्यंत थंड पाण्याखाली धरा.
● आग लागल्यास विझविण्यासाठी जाड पोते किंवा जाड चादरीचा वापर करावा.
● जखम गंभीर स्वरूपाची असल्यास घरगुती उपाय न करता दवाखाण्यात जावे.