फटाक्यांच्या आगीत मृत्यू झालेल्या तीन कुटुंबांना पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते धनादेशांचे वितरण – महासंवाद

    - Advertisement -

    हिंगोली, दि. २२ (जिमाका) : मागील महिन्यात हिंगोली शहरातील कपडागल्ली परिसरात फटाक्यांमुळे लागलेल्या आगीत झालेल्या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते आज शासकीय विश्रामगृह येथे प्रत्येकी एक लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले.

    दसरा महोत्सव समितीचे अध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे व सचिव तथा तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांच्यावतीने या घटनेतील तीन मृतांच्या कुटूंबाना प्रत्येकी एक लाख रुपयांचे आर्थिक मदत देण्यात आली. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या अविनाश काशिनाथ बांगर यांच्या आई वंदनाबाई काशिनाथ बांगर, दिलीप  दोडके यांच्या पत्नी मालती  दोडके आणि आकाश पंडित सांगळे यांच्या आई सुनीता  सांगळे यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा धनादेश पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

    यावेळी आमदार संतोष बांगर, आमदार राजू नवघरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोदवड, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, तलाठी अनिल काळे, पदाधिकारी आदीची उपस्थिती होती.

    ००००

    - Advertisement -