हायलाइट्स:
- चित्रा वाघ यांचा राज्य सरकारवर निशाणा
- देवेंद्र फडणवीस यांचा फोटो केला ट्वीट
- देवेंद्र फडणवीस यांचे वाघ यांनी केलं कौतुक
आंबेघरमधील गावकऱ्यांचे तात्पुरते स्थलांतर केलेल्या मोरगिरीतील मोरणा विद्यालय आणि धावडे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये फडणवीस आणि दरेकर पोहोचले. यावेळी कुटुंबांनी फडणवीस यांच्यासमोर दु:ख मांडले. सकाळपासून या छावणीतील रहिवासी उपाशी होते. फडणवीस यांनी या मंडळींना मानसिक आधार दिला. तसंच, ते स्वतः त्यांच्याबरोबर जेवले. यावरुन चित्रा वाघ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या साधेपाणाचे कौतुक केलं आहे.
वाचाः मुंबईत पावसाने मोडले विक्रम; जून-जुलैमध्येच वार्षिक सरासरी ओलांडली
चित्रा वाघ यांनी ट्वीट करत फडणवीसांचे कौतुक केलं आहे तर ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘एकीकडे महापुरात उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाची जाहीर मुस्कटदाबी अन् दुसरीकडे मांडीला मांडी लावून दोन घास घेत सावरण्यासाठीचं बळ आणि सोबत असल्याचा विश्वास. खरंच चित्रं खूप बोलकी असतात,’ असं ट्वीट चित्रा वाघ यांनी केलं आहे.
वाचाः रस्त्यांच्या कामासाठी हजारो कोटींचा खर्च; तरीही मुंबई खड्ड्यात
वाचाः लॉकडाऊननंतर पूराचा फटका; उद्ध्वस्त झालेला संसार कसा उभा करणार?