हायलाइट्स:
- देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्तानं शुभेच्छांचा वर्षाव
- भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं फडणवीसांचं कौतुक
- फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, अशी व्यक्त केली सदिच्छा
वाचा: स्वप्नील लोणकरच्या कुटुंबीयांना भाजपचा दिलासा; लाखो रुपयाचं कर्ज फेडलं!
पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते. ‘देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षांत मुख्यमंत्री म्हणून काम करताना सामान्य माणसाला सुख देण्यासाठी व त्याचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले,’ असं पाटील म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. राजकारणातील परखड माणूस अशा शब्दांत त्यांनी अजितदादांचा गौरव केला. ‘नेत्यांच्या वाढदिवसाला बेकायदा होर्डिंग्ज लावून नेत्यांना अडचणीत आणू नका आणि आचारसंहिता पाळा, असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं. बेकायदेशीर होर्डिंग्ज लावणाऱ्या कार्यकर्त्यांवरील कारवाईचंही त्यांनी समर्थन केलं.
मी अजित पवारांशी सहमत आहे – पाटील
करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात असलेल्या निर्बंधांवरून त्यांनी राज्य सरकारला लक्ष्य केलं. ‘करोनाच्या भीतीमुळं अनिश्चित काळासाठी समाज बंद करून ठेवणार का, असा सवाल त्यांनी केला. लसीचे दोन डोस घेतलेल्यांना योग्य काळजी घेऊन व्यवहार करण्याची परवानगी सरकारनं दिली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. ‘अजित पवार आणि राजेश टोपे यांच्याप्रमाणंच माझंही मत आहे. मी ते आधीपासूनच व्यक्त केलं आहे. लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, फिजिकल डिस्टन्सिंग, गर्दी टाळणे असे नियम पाळून काम सुरू केले पाहिजे. ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले त्यांच्यासाठी व्यवहार खुले करावेत. जनजीवन बंद ठेवून चालणार नाही, परिस्थितीला सामोरं जावं लागेलच,’ असं ते म्हणाले.
वाचा: फडणवीसांची ती योजना ‘झोलयुक्त’च होती; काँग्रेसचा हल्लाबोल