हायलाइट्स:
- देवेंद्र फडणवीस यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे महाविकास आघाडी सरकारची तक्रार.
- राज्य सरकार कायद्याने चालत नसून येथे राज्यघटनेची पायमल्ली होत आहे हे राष्ट्रपतींच्या निदर्शनास आणून द्या- फडणवीस यांची राज्यपालांना विनंती.
- फडणवीस यांनी राज्यपालांकडे एकूण तीन मागण्या केल्या आहेत.
राज्य सरकार अधिवेशनापासून पळ काढत असून अधिवेशनाचा कालावधी दोन दिवसांऐवजी पूर्णवेळ अधिवेशन घ्यावे, विधानसभा अध्यक्षांची रखडलेली निवडणूक घ्यावी आणि ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देऊ नका, अशा मागण्या फडणवीस यांनी राज्यपालांकडे केल्या आहेत.
क्लिक करा आणि वाचा- करोनाचे नियम पाळूच, पण मूर्तीमात्र उंचच आणू: गणेशोत्सव मंडळांची भूमिका
राज्यपालांची भेट घेतल्यानंतर फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. फडणवीस म्हणाले की, राज्य सरकार अधिवेशनापासून पळ काढत आहे. सरकारी पक्षाचे कार्यक्रम होत असल्याचे आपण पाहतो, पण करोनाचे कारण सांगून अधिवेशन मात्र दोन दिवसांचेच घेतले जात आहे. तर दुसरीकडे जिल्हा परिषदांच्या निवडणुका देखील घेतल्या जात आहेत. या निवडणुकांना ना कोणता डेल्टा ना कोणता व्हायरस. राज्यात अनेक घोटाळे बाहेर येत आहेत, महिला, विद्यार्थी याचे प्रश्न, आरक्षणाचा प्रश्न असे प्रश्न पाहायला मिळत आहेत. याच कारणामुळे सरकार अधिवेशनापासून पळ काढत आहे. अधिवेशन अधिक दिवसांचे असावे अशी मागणी आज आम्ही राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे केली.
क्लिक करा आणि वाचा- करोना योद्ध्यांना कोल्हापूरकरांचा सलाम; झळकले कौतुकाचे फलक, पालकमंत्र्यांचा पुढाकार
या वेळी फडणवीस यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरही भाष्य केले. विधानसभा अध्यक्षपद रिक्त ठेवता येत नाही. मात्र, तरीही विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेतली जात नाही. अध्यक्षपद रिक्त ठेवणे हे राज्यघटनेचे अवमूल्यन केल्यासारखे आहे. महाराष्ट्रात राज्यघटनेनुसार कारभार होत नाही, हे आपण राष्ट्रपतींना कळवा, असे आम्ही राज्यपाल कोश्यारी यांना सांगितले आहे, असे फडणवीस म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- देवेंद्र फडणवीस आक्रमक; राज्य सरकारला दिला ‘हा’ इशारा
ओबीसी आक्षरण मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका
राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण गेले. गेल्या ४० ते ५० वर्षांमध्ये पहिल्यांदाच असे घडले आहे. जो पर्यंत आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही, तो पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका,असे आम्ही सांगितले होते. मात्र तरीही निवडणुका जाहीर करण्यात आल्या. या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात अशी विनंती आम्ही राज्यपालांना केली असल्याचे फडणवीस म्हणाले. राज्य सरकारने ओबीसी समाजाचा विश्वासघात केल्याची टीकाही त्यांनी केली.