
मुंबई,दि.१४: फळपीक विमा योजना मृग बहार २०२५ साठी शेतकऱ्यांनी भाग घेण्यासाठी विमा एनसीआयपी (NCIP) पोर्टल www.pmfby.gov.in सुरू झाले आहे. यात भाग घेण्यासाठी प्रत्येक फळनिहाय अंतिम दिनांक पुढील प्रमाणे आहे. लिंबू, द्राक्ष, पेरू, संत्रा:- १४ जून , मोसंबी ,चिकू ३० जून, डाळिंब १४ जुलै , सीताफळ ३१ जुलै पर्यंत पीक विमा उतरवता येवू शकतो.
कमी पाऊस, जास्त पाऊस, पावसातील खंड, जास्त आर्द्रता या सारख्या हवामान घटक यांचा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.त्या मुळे होणाऱ्या आर्थिक नुकसान परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते .योजनेत भाग घेण्यासाठी आवश्यक बाबी पुढीलप्रमाणे आहे. Agristack नोंदणी क्रमांक , आधार कार्ड, बँक पासबुक,जमीन धारणा उतारा,Geo tag फोटो ,ई – पिक पहाणी बंधनकारक आहे, ई पीक पाहणी नोंद नसल्यास पिक विमा अर्ज रद्द होऊ शकतो.ई पीक नोंदणी पिक विम्यात भाग घेतल्यानंतर जुलै – ऑगस्ट महिन्यात करू शकतात.जास्त माहिती घेण्यासाठी नजिकच्या विमा कंपनी कार्यालय , तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे .
0000





















WhatsApp