Home मनोरंजन फिटनेसचा फंडा; मराठी कलाकारांनी सांगितले योगाचे फायदे

फिटनेसचा फंडा; मराठी कलाकारांनी सांगितले योगाचे फायदे

0
फिटनेसचा फंडा; मराठी कलाकारांनी  सांगितले योगाचे फायदे

[ad_1]

रोज दोन तास योगयोग ही एक जीवनशैली आहे. ती तुम्हाला, तुमच्या मनाला आणि शरीराला अधिक समजण्यासाठी मदत करते. योगामुळे श्वासावरचं नियंत्रण, मानसिक शांतता या गोष्टींमध्ये खूप फरक पडतो. लॉकडाउनमध्ये आजूबाजूच्या परिस्थितीशी सामना करण्याचं बळ मला योगामुळे मिळालं. मी नित्य नियमाने रोज दोन तास योग करते, जप करते आणि तो वेळ फक्त माझा असतो.
– अमृता खानविलकर

योगाचे अनेक फायदेएक कलाकार म्हणून आवाजातले चढ-उतार, श्वासावरचं नियंत्रण, क्षमता वाढवणं यासाठी योगाचा खूप उपयोग झाला. लॉकडाउनच्या काळात मी एकटी राहत होते. तेव्हा ध्यानधारणेमुळे खूप फरक पडला. रोज एक तास योगाभ्यास, संध्याकाळी नृत्य आणि ध्यानधारणा याने सकारात्मकता मिळाली. आपल्या संस्कृतीचे किती उत्तम फायदे आहेत हे योग दिवसामुळे सगळ्यांना समजतंय, याचा आनंद वाटतो.

मानसिक आरोग्यासाठी उपयुक्तपूर्वी मी जीममध्ये व्यायाम केला असल्यानं सुरूवातीला मला योग फार आवडत नव्हतं. योगाची सगळी आसानं फार सांभाळून करायची असतात. मला माझं शरीर अधिक लवचिक करायचं होतं. आपल्याला दोन हातांवर शरीराचा तोल सांभाळता येऊ शकतो हा आनंद कमाल असतो. मला मुलगा झाल्यानंतर खऱ्या अर्थानं योगाचा प्रवास सुरू झाला. स्वतःला फिट ठेवण्यासाठी, मानसिक आरोग्यासाठी योगाचा खूप उपयोग झाला.
– माधवी निमकर

दिनचर्येचा भागयोग ही एक साधना आहे. योग हा माझ्या दिनचर्येचा भाग झाला आहे. आईनं मला लहानपणापासून आसनं शिकवली आहेत. तेव्हापासून मला आसनं करायला खूप आवडतं. योग फक्त शारीरिकच नाही तर मानसिक स्वास्थ्यदेखील उत्तम ठेवतो. योगामुळे मनःशांती मिळते. त्यामुळे आंतरिक शांतता मिळण्यासाठी मी योग करते.
– ऋतुजा बागवे

आसनांमुळे होतात बदलमी कॉलेजच्या दिवसांपासून व्यायाम करायला सुरूवात केली. तेव्हापासून मी स्ट्रेचिंग करायचो आणि त्यानं शरीर लवचिक झालं. एकदा काही आसनं बघून योग करू या, असं वाटलं. त्यातील काही आसनं मला सहज जमली आणि तिथून योगाचा प्रवास सुरू झाला. आसनांमुळे होणारे बदल वाचले आणि ते प्रत्यक्षात घडतात, हे समजल्यावर योग नियमित करायला लागलो. अनुभवी व्यक्तीकडून योगाविषयी अजून भरपूर शिकायचं आहे.
– भुषण प्रधान

मुलीपर्यंत योग पोहोचलालॉकडाउनमध्ये सकारात्मकता मिळण्यासाठी, शांततेसाठी योगाभ्यास करू लागले. योगामुळे तुला छान वाटेल असं काही मैत्रिणींनी सुचवलं. मी सूर्यनमस्कारापासून सुरूवात केली आणि युट्यूबवर बघून योग करू लागले. मला योग करताना बघून माझ्या मुलीमध्येही आवड निर्माण झाली आणि तिला शाळेत शिकवलेले काही प्रकार तिने मला शिकवले. आता आम्ही दोघीही एकत्र योग करतो.
– समिधा गुरु

संकलन: संपदा जोशी

[ad_2]

Source link