Home बातम्या ऐतिहासिक फेसबुक आता व्हॉट्सऍप, इन्स्टाग्रामचे नाव बदलणार

फेसबुक आता व्हॉट्सऍप, इन्स्टाग्रामचे नाव बदलणार

0

 नवी दिल्ली:

इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सऍप हे जगातील सर्वाधिक लोकप्रिय सोशल नेटवर्किंग ऑप्लिकेशन्स आहेत. या दोन्ही सेवा फेसबुकच्या मालकीच्या आहेत. मात्र अनेकांना हे माहीत नाही. त्यामुळे व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम सेवा आपल्या मालकीची आहेत, हे दाखवण्यासाठी फेसबुक त्यांची नाके बदलणार आहे. इन्स्टाग्रामचे नाव बदलून ‘इन्स्टाग्राम फ्रॉम फेसबुक’ आणि व्हॉट्सऍपचे नाव बदलून ‘व्हॉट्सऍप फ्रॉम फेसबुक’ असे करण्यात येणार आहे.

फेसबुकने व्हॉट्सऍप आणि इन्स्टाग्राम या दोन्ही लोकप्रिय ऑप्लिकेशन्सचे रिब्रॅण्डिंग करणार असल्याचे जाहीर केले आहे. भविष्यात फेसबुक, व्हॉट्सऍप आणि इन्स्टाग्राम एकमेकांशी संलग्न करण्याचा कंपनीचा विचार असल्याचीही चर्चा आहे. ‘इन्स्टाग्राम फ्रॉम फेसबुक’ आणि ‘व्हॉट्सऍप फ्रॉम फेसबुक’ ही बदललेली नावे गुगल प्लेवर आणि ऍपलच्या आयस्टोअरकर दिसतील. तसेच या दोन्ही साईटच्या लॉगइन पेसेववरील नावांच्या नंतरही ‘फ्रॉम फेसबुक’ या शब्दांचा समावश केला जाणार आहे.