Home ताज्या बातम्या फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप डाऊन; अनेकांना येतोय ‘हा’ प्रॉब्लेम

फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप डाऊन; अनेकांना येतोय ‘हा’ प्रॉब्लेम

मुंबई : मार्क झुकेरबर्गच्या मालकीचं असलेलं फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअप डाऊन झालं आहे. जगभरातील करोडो लोकांना सध्या याचा अनुभव येत आहे.

फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपवर लोकांना फोटो पाठवता येत नाहीत. तसेच फोटो डाऊनलोडसुद्धा करता येत नाहीत.

अनेकांनी ट्विटर तसेच इतर सोशल मीडिया साईट्सवर यासंदर्भात तक्रार करण्यात सुरुवात केली आहे. काही ठिकाणी तर फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअपची खिल्ली उडवली जात आहे.

दरम्यान, एकाच कंपनीचे असलेल्या तिन्ही प्लॅटफॉर्मवर लोकांना अडचणी येत आहेत, मात्र याप्रकरणी फेसबुककडून कुठलंही स्पष्टीकरण आलेलं नाही.