Home अश्रेणीबद्ध फोटोग्राफीसाठी मनात संवेदनशीलता हवी पोलीस आयुक्त के. वेंकटेशम

फोटोग्राफीसाठी मनात संवेदनशीलता हवी पोलीस आयुक्त के. वेंकटेशम

0

फोटोग्राफीसाठी मनात संवेदनशीलता हवी – पोलीस आयुक्त के. वेंकटेशम

यशवंतराव चव्हाण नाट्यमंदिर कलादालनात येथे ‘कलाधिपती’ छायाचित्र प्रदर्शनाला सुरुवात

पुणे : परवेज शेख आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात स्मार्टफोनमुळे होतकरू फोटोग्राफर्सना नवे पर्याय उपलब्ध झाले आहेत. फोटोग्राफीसाठी मनात संवेदनशीलता असणे आवश्यक आहे. या संवेदनशीलातेला कलात्मकतेची जोड मिळाल्यास छायाचित्र जिवंत होतात. मुंबईमध्ये असताना वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केलेले गणेशोत्सवातील अनेक चांगली छायाचित्रे आजही मी जपून ठेवली आहेत. त्यामुळे छायाचित्रकारांनी आपली ही आवड जपावी, असा सल्ला पुण्याचे पोलीस आयुक्त के. वेंकटेशम यांनी दिला.

स्टारविन्स ग्रुपच्या वतीने ‘कलाधिपती’ या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन १ ते ३ नोव्हेंबर दरम्यान यशवंतराव चव्हाण नाट्यमंदिराच्या कलादालनात करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन पुण्याचे पोलीस आयुक्त के. वेंकटेशम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ढोल ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडलाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष विवेक खटावकर, तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष राजाभाऊ टीकार, लिव्हिंग रिव्हर फाउंडेशनच्या संस्थापिका अदिती देवधर आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रदर्शनामध्ये देशभरातील सुमारे २५ छायाचित्रकारांनी काढलेल्या १०० छायाचित्रांचा समावेश करण्यात आला आहे. या छायाचित्रातून ६४ कलांचा अधिपती असलेल्या गणेशाची विविध रूपे पाहता येणार असून गणेशाची पूर्वतयारी, दहा दिवसीय गणेशोत्सव, त्यानंतरची स्थिती अशी विविध छायाचित्राचा यात समावेश करण्यात आला आहे.

यावेळी बोलताना पराग ठाकूर म्हणाले की, युवाकांमध्ये असलेल्या उर्जेला चांगली दिशा देण्याचे काम गणेशोत्सवाच्या निमित्ताने करण्यात येते. पथकाच्या संस्कृतीमुळे आपल्या अनेक परंपरा टिकून आहेत. याबरोबरीने आपल्या लाडक्या बाप्पा बरोबरचे अनेक क्षण छायाचित्रकार जिवंत करत असतात.

यावेळी लिव्हिंग रिव्हर फाउंडेशनच्या संस्थापिका अदिती देवधर, कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडलाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष विवेक खटावकर, तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष राजाभाऊ टीकार यांनी आपले विचार व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज लोखंडे यांनी तर, आभार प्रणव तावरे यांनी मानले.