Home गुन्हा ”बँकघोटाळ्याप्रकरणी”71 कोटींचा” अपहार केल्याचा आरोप आमदार अनिल भोसलेंसह चौघांना अटक…

”बँकघोटाळ्याप्रकरणी”71 कोटींचा” अपहार केल्याचा आरोप आमदार अनिल भोसलेंसह चौघांना अटक…

0

पुणे : पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या दफ्तरामध्ये बनावट नोंदी करून आणि त्या खऱ्या असल्याचे भासवून तब्बल ७१ कोटी ७८ लाखांचे व्यवहार लपवून रकमेचा अपहार केल्याप्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसाचे विधान परिषदेचे आमदार अनिल शिवाजीराव भोसले व त्यांच्या पत्नी आणि भाजप नगरसेविका रेश्मा अनिल भोसले यांच्यासह १६ जणांविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी रात्री आमदार अनिल भोसले यांच्यासह बँक अधिकारी शैलेश भोसले, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी पडवळ आणि बँक अधिकारी सूर्याजी जाधव यांना अटक केली आहे.

हा प्रकार २३ मे २०१९ पूर्वी घडलेला आहे. याप्रकरणी चार्टर्ड अकाउंटंट योगेश लकडे यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार भोसले दांपत्यासह १६ जणांवर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.