Home गुन्हा बँक अधिकाऱ्यांना मारहाण करणाऱ्या मनसे उपाध्यक्षाला अटक

बँक अधिकाऱ्यांना मारहाण करणाऱ्या मनसे उपाध्यक्षाला अटक

पुणे: प्रतिनिधी (संतोष सावंत) पुणे शेतकऱ्यांचा आर्थिक छळ केला जात असल्याच्या कारणावरुन
सहारा बँकेच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी वणी पोलिसांनी मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्यासह सहा कार्यकर्त्यांना शुक्रवारी सकाळी अटक केली.

ठेवीदार शेतकऱ्यांचा बँकेकडून आर्थिक छळ केला जात असल्याच्या मुद्यावरून बुधवारी दुपारी राजू उंबरकर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी येथील नागपूर रोड़ असलेल्या सहारा बँकेच्या शाखेत जाऊन राडा केला होता. उंबरकर व इतरांनी तेथील बँक अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना धमकावित मारहाण केली होती. मात्र, याप्रकरणी बँक अधिकाऱ्यांनी चुप्पी साधली होती. पोलिसांकडे कोणीही तक्रार न दिल्याने त्यांनीही कोणतीही कारवाई केली नाही. गुरुवारी सायंकाळी बँक अधिकाऱ्यांना मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल झाला. त्याची वणीसह परिसरात मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली़. त्यानंतर वणी पोलिसांनी बँक अधिकाऱ्यांकडे चौकशी केली. तेव्हा बँकेच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी रात्री पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यानंतर आज सकाळी पोलिसांनी राजू उंबरकर व त्यांच्या ६ कार्यकर्त्यांना अटक केली. या प्रकरणात आणखी काही आरोपींना अटक केली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.