‘बचपन का प्यार’ हे सहदेवने गाणं गायले आहे. त्याच्या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे. अनेक सेलिब्रिटींनी हा व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ पाहिल्यावर अनुष्काने तिच्या इन्स्टा स्टोरीवर या व्हिडिओसंदर्भातील एक मजेशीर मीम शेअर केले आहे. यामध्ये दिसते की, एक व्यक्ती रात्री झोपण्याचा प्रयत्न करत असतानाच त्याच्या डोक्यात सहदेवने गायलेले ‘बचपन का प्यार’ हे गाणे फिरायला लागते त्यामुळे त्याला झोप लागत नाही. या मीमसोबत अनुष्काने दोन-तीन स्माईली देखील शेअर केला आहे.
व्हायरल झालेल्या ‘बचपन का प्यार’ हा व्हिडिओ सहदेवच्या शाळेतील शिक्षकांनी काढला आहे. २०१९ मध्ये हा व्हिडिओ केला होता. या व्हिडिओमध्ये शाळेचा निळ्या रंगाचा गणवेश घातलेला सहदेव कॅमेऱ्याकडे पाहून गाणे गाताना दिसत आहे. हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की गायक बादशहाने त्याचे रीमिक्स व्हर्जन शेअर केले आहे. तसेच बादशाहाने व्हिडिओ कॉलद्वारे सहदेवसोबत संवाद साधला. त्यावेळी त्याने सहदेवला चंदीगडलादेखील बोलावले. बादशहा आणि सहदेव मिळून गाणे रेकॉर्ड करणार असल्याचे म्हटले जात आहे. इतकेच नाही तर छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी देखील सहदेवचे कौतुक केले आहे.
एका मुलाखतीत सहदेवने सांगितलं की त्याचे वडील शेतकरी आहेत. त्याच्या घरी टीव्ही, मोबाईल नसल्याचे त्याने सांगितले. मोठे झाल्यावर गायक होण्याची इच्छा सहदेवने व्यक्त केली.
दरम्यान, अनुष्का शर्माच्या कामाबाबत सांगायचे तर २०१८ मध्ये रिलीज झालेल्या ‘झीरो’ नंतर ती कोणत्याही सिनेमात दिसली नाही. सध्या अनुष्का तिच्या मुलीच्या वामिकाची काळजी घेत आहे. त्याचसोबत निर्मितीमध्येही कार्यरत आहे. तिची निर्मिती असलेले ‘पातल लोक’, ‘बुलबुल’, ‘काला’ या कलाकृती प्रदर्शित झाल्या आहेत.