Home मनोरंजन ‘बचपन का प्यार’ गाणाऱ्या मुलाला मिळालं बादशाहकडून खास भेट

‘बचपन का प्यार’ गाणाऱ्या मुलाला मिळालं बादशाहकडून खास भेट

0
‘बचपन का प्यार’ गाणाऱ्या मुलाला मिळालं बादशाहकडून खास भेट

[ad_1]

हायलाइट्स:

  • सोशल मीडियावर वायरल होतोय दोन वर्षांपूर्वीचा व्हिडीओ
  • शाळेतील शिक्षकांसमोर गाणं गात आहे मुलगा
  • चाहत्यांमध्ये बादशाह आणि सहदेवचा व्हिडीओ पाहण्याची उत्सुकता

मुंबई– सोशल मीडियावर दररोज काहीनाकाही वायरल होत असतं. कधी एका चहावाल्या मुलाचं सौंदर्य पाहून नेटकरी अवाक होतात तर कधी भाकऱ्या करताना गाणाऱ्या मुलीला पाहून नेटकरी तिचं कौतुक करतात. पाहता पाहता ही मंडळी सोशल मीडियावर वायरल होतात. एका छोट्याश्या गोष्टीतून मोठा बदल घडवण्याची ताकद या सोशल मीडियाकडे आहे. असाच एक व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर वायरल होत आहे. ज्यात एक शाळेचा गणवेश घातलेला मुलगा ‘जाने मेरी जानेमन बचपन का प्यार’ गाणं गाताना दिसतोय. हा व्हिडीओ जवळपास दोन वर्ष जुना आहे. परंतु, पुन्हा एकदा तो सोशल मीडियावर वायरल होतोय. महत्वाचं म्हणजे हा व्हिडीओ पाहून बॉलिवूडचा प्रसिद्ध रॅपर बादशाह याने व्हिडिओतील मुलाला भेटीचं निमंत्रण दिलं आहे.
Bigg Boss 15: बिग बॉस ओटीटीचे सूत्रसंचालन करण जोहरच्या हाती

सोशल मीडियावर वायरल होणाऱ्या व्हिडिओचा ओरिजनल व्हिडीओ दोन वर्षांपूर्वी युट्यूबवर अपलोड करण्यात आला होता. ज्यात एक शाळकरी मुलगा त्याच्या शिक्षकांसमोर ‘बचपन का प्यार मेरा भूल नही जाना रे’ गाताना दिसतोय. या मुलाचं नाव सहदेव असून तो छत्तीसगड राज्यातील सुकमा येथील छिंदगड येथे राहतो. पुन्हा एकदा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार वायरल झाला. या व्हिडिओची लोकप्रियता इतकी वाढली की बादशाहने स्वतः त्याच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने सहदेवसोबत संपर्क साधला. बादशाहने मुलासोबत व्हिडीओ कॉलवर गप्पा मारल्या आणि त्याला चंदीगढला भेटायला बोलवलं. यानंतर बादशाह आणि सहदेव लवकरच एखाद्या गाण्यात एकत्र दिसण्याची शक्यता वर्तवली जातेय.

https://www.youtube.com/watch?v=Gvz6DHn3lpo

वायरल झालेल्या या व्हिडिओला अनेक नेटकऱ्यांनी त्यांच्या अकाऊंटवर शेअर केलं आहे. नेटकऱ्यांसोबत अनेक कलाकारांनीही हा व्हिडीओ शेअर केला आहे. परंतु, स्वतः बादशाहने सहदेवसोबत साधलेला संपर्क पाहता त्यांच्या व्हिडिओची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

राज कुंद्राच्या कंपनीचा शिल्पा शेट्टीनं का दिला राजीनामा?

[ad_2]

Source link