Home पोलीस घडामोडी बनावट गौण खनिज वाहतूक परवाने बनवून ते विक्री करणाऱ्या टोळीच पर्दाफाश….

बनावट गौण खनिज वाहतूक परवाने बनवून ते विक्री करणाऱ्या टोळीच पर्दाफाश….

बनावट गौण खनिज वाहतूक परवाने बनवून महराष्ट्र शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात खंडणी विरोधी पथक ठाणे पोलिसांना यश आले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, शिवसेना शाखेजवळ शिवाजी चौक, कळवा येथे एक इसम जिल्हाधिकारी ठाणे यांच्या कडील गौण खनिज वाहतूक परवाना बनावट पावती पुस्तके विक्री करण्यासाठी घेऊन येणार असल्याबाबत खंडणी विरोधी पथकाचे वपोनि प्रदीप शर्मा यांना गुप्त बातमीदारांकडून बातमी मिळाली. या मिळालेल्या बातमी वरून सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तहसीलदार मुकेश पाटील यांच्यासह शिवाजी चौक, कळवा येथे सापळा रचून विक्की बिभीषण माळी यांस ताब्यात घेऊन त्याच्याकडून जिल्हाधिकारी ठाणे यांच्या कडील गौण खनिज वाहतूक परवान्यांचे दोन बनावट पावती पुस्तके जप्त केली. तसेच याप्रकरणी तहसीलदार मुकेश पाटील यांनी दिलेल्या तक्रारारीवरून कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात पोलिसांनी पुढील तपासात विक्की बिभीषण माळी, अब्दुल समद बहाउद्दीन, पद्माकर दत्ताराम राणे, शाजी वल्लीथ पुन्नन, अरविंद सूर्यकांत पेवेकर, प्रशांत रघुनाथ म्हात्रे, धनसुख उर्फ लकी ईश्वरभाई सुतार, उमेश गजोधर यादव, राजू माधव पवार, रवी वेदप्रकाश जैस्वाल यांना अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे १ कोटी २८ लाख रुपये किंमतीची १५६ बनावट गौण खनिज परवाना पावती पुस्तके तसेच लॅपटॉप, मोबाईल फोन, पेनड्राईव्ह, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.