काय म्हणाली श्रुती गेरा
अभिनेत्री श्रुती गेराने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये खळबळजनक आरोप केले आहेत. तिने या मुलाखतीमध्ये सांगितले की, ‘बॉलिवूडमध्ये अनेकदा नवोदित कलाकारांना ड्रग्ज देऊन त्यांचे न्यूड व्हिडिओ काढले जातात. त्यानंतर त्यांना पॉर्न फिल्ममध्ये काम करण्यासाठी जबरदस्ती केली जाते.’ श्रुतीने तिच्या मुलाखतीमध्ये पुढे सांगितले की, ‘राज कुंद्राची कंपनी नवोदित अभिनेत्रींना वेब शोमध्ये काम दिले जाईल, असे सांगत त्यांच्याशी करार करायचे. त्यानंतर त्यांच्याकडून अश्लिल व्हिडिओ करण्याची मागणी केली जायची. काही अभिनेत्रींनी मला राजच्या कंपनीतील काही लोकांनी त्यांच्याकडे न्यूड व्हिडिओ मागितल्याचेही सांगितले होते.’
राज कुंद्राच्या प्रोजेक्टसाठी विचारणा झाली होती
या मुलाखतीमध्ये श्रुतीने पुढे सांगितले की, ‘२०१८ मध्ये राज कुंद्राच्या कंपनीकडून मलादेखील वेब सीरिजमध्ये काम करण्यासाठी विचारणा झाली होती. परंतु त्याला मी नकार दिला. आता मी देवाचे मनापासून आभार मानते की या सगळ्यापासून मी वाचले. आपण सगळेच राज कुंद्राला एक यशस्वी आणि मोठा उद्योजक समजत होतो परंतु आता कळले की तो पॉर्न फिल्म बनवतो.’
Explainer- Erotic आणि Porn Film मध्ये काय फरक असतो, यातच अडकली आहे राज कुंद्राची Pornography Case
नवोदित अभिनेत्रींना दिले जाते ड्रग्ज
श्रुती गेराने २००९ मध्ये ‘टॉस : ए फ्लिप ऑफ डेस्टनी’ या सिनेमात काम केले होते. त्यानंतर २०१८ पासून श्रुती सिनेविश्वापासून दूर गेली आणि तिने स्वतःची कंपनी काढली. या मुलाखतीमध्ये श्रुतीने सांगितले की, ‘जेव्हा मी या सिनेविश्वाचा भाग होते इथे काम करत होते, तेव्हा मी अनेकजणींकडून त्यांचे धक्कादायक अनुभव ऐकले होते. नवोदित अभिनेत्रींना ड्रग्ज दिले जाताता आणि त्यानंतर त्यांचे अश्लील व्हिडिओ चित्रीत केले जातात. त्यानंतर त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पॉर्न फिल्ममध्ये काम करवून घेतला जाते. ही गोष्ट बॉलिवूडमध्ये अगदीच सामान्य आहे. इतकेच नाही तर हनी ट्रॅपद्वारेसुद्धा नवोदित अभिनेत्रींना अडकवले जाते. माझ्याबाबतीत असे घडले आहे. परंतु निर्मात्यांचा हेतू मला चांगला वाटला नाही त्यामुळे मी त्यांना नकार दिला. अर्थात प्रत्येकवेळी हे करणे शक्य नसते.’