चार वर्षांपूर्वी हडपसर परिसरात राहत असताना १४ वर्षांच्या (तेव्हा अकरा वय) मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी शिक्षा भोगत असताना जामिनावर आलेल्या आरोपीने घरी येऊन धाकट्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना देहू रोड परिसरात घडली.
देहूरोड पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करून बापाला अटक करण्यात आली आहे.
अधिक माहितीनुसार: चार वर्षांपूर्वी हडपसर परिसरात राहत असताना १४ वर्षांच्या (तेव्हा अकरा वय) मुलीवर याच आरोपी बापाने बलात्कार केला होता. त्यामुळे त्याला अटक करून, त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली होती.
दरम्यान हा आरोपी काही दिवसांपूर्वी कारागृहातून जामिनावर बाहेर आला. त्याने घरी आल्यावर अकरा वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला.
मुलीच्या आईला ही बाब समजल्यावर तिने मुलीला घेऊन दवाखाना गाठला. तेथील डॉक्टरांना घडलेली माहिती सांगितली.
डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी करताच तत्काळ ही बाब देहूरोड पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविली. पोलिसांनी प्रथम नराधम बापाला अटक केली.