बिलोली : जळतनासाठी लाकडे आणण्यासाठी शेतात गेलेल्या महिलेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस बिलोली येथील अति.जिल्हा व सञ न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.के मांडे यांनी १० वर्षे कैद व २ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.
दि.१९ मार्च २०१३ रोजी बिलोली तालुक्यातील सावळी येथील पिडीत महिला ही सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास जळतनाची लाकडे आणण्यासाठी शेतात गेली होती.त्याच सुमारास गावातीलच दिलीप सुरेश देवकरे वय ३० वर्ष हा तेथे आला व पिडीत महिलेचे लुगड्याच्या पदराने तोंड बांधून तेथुन जवळच असलेल्या संगनोड यांच्या शेतात नेऊन तीच्यावर जबरदस्ती बलात्कार केल्याची फिर्याद बिलोली पोलिस स्टेशन येथे देण्यात आली.आलेल्या फिर्यादीवरून घटनेचा तपास करून आरोपी विरूध्द न्यायालयात दोषारोपपञ दाखल केले.
न्यायालयात सरकार पक्षातर्फे आठ साक्षीदार तपासण्यात आले.सरकार पक्षातर्फे सादर करण्यात आलेले पुरावे व युक्तीवाद ऐकून अति.जिल्हा व सञ न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.के मांडे यांनी आरोपी दिलीप देवकरे यास कलम ३७६ भा.द.वी अन्वये दोषी ठरवून १० वर्षे कैद व २००० रूपये दंडाची शिक्षा सुनावली.सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे अँड.संदिप कुंडलवाडीकर यांनी बाजू मांडली.
बलात्कार प्रकरणी आरोपीस १० वर्षाची कैद
- Advertisement -