हायलाइट्स:
- पर्ल पुरीच्या अटकेवरून दोन अभिनेत्रींमध्ये रंगलाय कलगीतुरा
- सोशल मीडियावर एकमेकींवर करत आहेत टीका
- अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पर्ल अटकेत
काय म्हणाली देवोलिना
‘साथ निभाना साथिया’ या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी ने पर्लच्या विरोधात भूमिका घेतली आहे. इतकेच नाही तर त्याला पाठिंबा देणाऱ्यांवर आणि त्या मुलीच्या पालकांची ओळख उघड करणाऱ्या सर्वांवर कडाडून टीका केली आहे. तिने ट्विटरवर म्हटले की, ‘आई-वडिलांनी जर माणुसकी शिकवली असेल तर त्या पिडीत मुलीच्या आईच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर मुर्खासारख्या कमेन्ट करण्यापूर्वी या लोकांनी शंभरवेळा विचार केला असता.’ देवोलिनाने पुढे असेही लिहिले आहे, ‘ज्या कुणा व्यक्तीने या मुलीच्या पालकांची आणि तिची ओळख उघड केली आहे. त्याला तर तुरुंगात टाकले पाहिजे.’
याच संदर्भात देवोलिनाने आणखी एक ट्वीट करत लिहिले की, ‘ काही तरी माणुसकी ठेवा… कसली घाणरेडी लोक आहात तुम्ही. डिक्शनरी उघडा आणि त्यामध्ये एम्पथी या शब्दाचा अर्थ शोधा मुर्ख लोकांनो. फालतू बडबड करणे बंद करा आणि कोर्टाला निकाल देऊ द्या. खरोखरच सध्याच्या काळात माणुसकी खालच्या पातळीवर आली आहे. हे सर्व खूपच वाईट आहे.’
नियाने उडवली देवोलिनीची खिल्ली
देवोलिनीने हे सर्व ट्वीट केल्यानंतर पर्लची बाजू घेणाऱ्या नियाने तिची सोशल मीडियावरच खिल्ली उडवली आहे. नियाने लिहिले आहे, ‘ दीदीला कोणीतरी जाऊन सांगा की सध्या करोना असल्याने आंदोलने आणि कँडल मार्च करता येणार नाही. त्याचसोबत दीदीला ते विचित्र डान्स रिल्स बनवण्यापूर्वी डान्सचा सराव करण्याची खूप गरज आहे.’
देवोलिनाने दिले असे उत्तर
नियाने अशा प्रकारे खिल्ली उडवल्यानंतर देवोलिनीने देखील तिला सडेतोड उत्तर दिले आहे. देवोलिनीने लिहिले आहे, ‘प्लीज छोटीला जाऊन कोणीतरी हे सांगा की फक्त फॅशन स्कील्स दाखवल्याने कोणी चांगला मनुष्य होत नाही. चांगले विचार आणि चांगलं हृदय असणं गरजेचं असतं, ज्याची कमतरता तिच्यात दिसतेय. मी माझे डान्स रिल्स व्हिडीओ चांगले करते की नाही ते माझ्या चाहत्यांनाच ठरवू दे. इथेसुद्धा परीक्षक होऊन बसली आहे. त्यापेक्षा तू तुझ्या फोटोशूटवर लक्ष दे.’
‘सात वर्षीय छोट्या मुलीवर टीका करणाऱ्या सर्वांसाठी माझे हे ट्वीट आहेत. फक्त छोटीलाच का मिर्ची लागली? कदाचित ती त्या लोकांपैकी एक असेल जे, सत्य पडताळून न पाहता बातम्यांवर लगेच प्रतिक्रिया देत असतात’, असंही देवोलिनाने नियाला सुनावलं.
दरम्यान, पर्ल पुरीला अटक झाल्यानंतर टीव्ही इंडस्ट्रीतील अनिता हसनंदानी, अली गोनी, क्रिस्टल डिसूझा, एकता कपूर यांनी सेलिब्रिटींनीही सोशल मीडियावर त्याची बाजू घेत समर्थन केले आहे.