Home शहरे अकोला बल्लारपूर परिसरातील रस्ते विकासासाठी ७५ कोटी रुपयांचा निधी

बल्लारपूर परिसरातील रस्ते विकासासाठी ७५ कोटी रुपयांचा निधी

0
बल्लारपूर परिसरातील रस्ते विकासासाठी ७५ कोटी रुपयांचा निधी

मुंबई, दि.१२ : बल्लारपूर परिसरातील पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या दृष्टीने भरीव निधीची तरतूद केल्याबद्दल परिसरातील जनतेच्या वतीने जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

राज्याच्या यावर्षीच्या अर्थसंकल्पात सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत बल्लारपूर परिसरातून जाणाऱ्या राज्यमार्ग मजबुतीसाठी ४१ कोटी तसेच प्रमुख जिल्हा मार्गांच्या विस्तारासाठी १४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून ग्रामीण भागातील रस्ते विकासाकरिता २०.१० कोटी असे एकूण ७५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

याशिवाय हायब्रीड अन्युटी प्रोग्रॅम अंतर्गत सुमारे 800 कोटी रुपये किंमतीच्या 4 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून या प्रकल्पांचा डीपीआर तयार करण्यासाठी 1 कोटी 71 लाख रुपयांची सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तरतूद करण्यात आली आहे.या अर्थसंकल्पात विविध विकास योजना आणि समाजातील प्रत्येक माणसाला दिलासा मिळाला आहे.

000