Home शहरे मुंबई बसमधील ‘जीपीएस’मुळे चोर गजांआड

बसमधील ‘जीपीएस’मुळे चोर गजांआड

0
बसमधील ‘जीपीएस’मुळे चोर गजांआड

[ad_1]

म. टा. प्रतिनिधी, ठाणे

खासगी बस चोरणाऱ्या आरोपींचा बसमधील जीपीएस यंत्रणेमुळे छडा लावण्यात कोनगाव पोलिसांना यश आले आहे. चार आरोपींना अटक करत पोलिसांनी चोरलेली बसही जप्त केली आहे. या प्रकरणी कोनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाण्यातील वाहतूक व्यावसायिक राजेश पुजारी यांची शनिवारी रात्री १८ लाखांची खासगी प्रवासी बस चोरीला गेली होती. त्यांनी तात्काळ पोलिसांकडे धाव घेत तक्रार केली. बसमध्ये जीपीएस यंत्रणा असल्याने ही बस मानकोली परिसरात असल्याचे समजले. कोनगाव पोलिसांनी नारपोली पोलिस ठाण्यातील पोलिसांच्या मदतीने बसचा शोध सुरू केला. यामध्ये पोलिसांना यशही मिळाले. रमीज गुलाम सैय्यद, आलीम नागेमिया अन्सारी, मोजीम हुसेनमिया अन्सारी, रुस्तम नूरमोहम्मद अन्सारी यांना अटक करण्यात आली. तसेच, त्यांच्याकडून बसही जप्त केली. चौघेही आरोपी भिवंडी परिसरातच राहतात. या गुन्ह्याची उकल करण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी अपर पोलिस आयुक्त अनिल कुंभारे, पोलिस उपायुक्त योगेश चव्हाण, सहाय्यक पोलिस आयुक्त प्रशांत ढोले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणपतराव पिंगळे, पोलिस निरीक्षक राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कोनगाव आणि नारपोली पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केली.

[ad_2]

Source link