मुंबई: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा‘ ही मालिका गेल्या १३ वर्षांपासून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमाचा प्रत्येक भाग हा मनोरंजक असतो. या मालिकेतील प्रत्येक पात्रानं प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं असं स्थान निर्माण केलं आहे. प्रेक्षक इतक्या बारकाईनं ही मालिका पाहात की, एखादी वेगळी किंवा अनोखी गोष्ट दिसली तरी त्याची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होते. सध्या चर्चा सुरू आहे ती म्हणजे, ‘बाघा‘ ही व्यक्तीरेखा साकारणाऱ्या तन्मय वेकरिया यांची.
जेठालालच्या गडा इलेक्ट्रॉनिक्समध्ये काम करणाऱ्या बाघानं ६१ हजारांचा हुडी घातल्यानं सोशल मीडियावर प्रेक्षकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
मालिकेचे ३२०० भाग पूर्ण
प्रेक्षकांकडूनही या कार्यक्रमाला भरभरून प्रेम आणि प्रतिसाद मिळत असल्यानेच या मालिकेनं ३ हजार २०० भागांचा टप्पा ओलांडत एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.
- Advertisement -