Home मनोरंजन बापाविरुद्धची न्यायलयीन लढाई हरली ब्रिटनी स्पीयर्स, वडिलांकडेच राहणार ‘कंजरवेटरशिप’

बापाविरुद्धची न्यायलयीन लढाई हरली ब्रिटनी स्पीयर्स, वडिलांकडेच राहणार ‘कंजरवेटरशिप’

0
बापाविरुद्धची न्यायलयीन लढाई हरली ब्रिटनी स्पीयर्स, वडिलांकडेच राहणार ‘कंजरवेटरशिप’

[ad_1]

हायलाइट्स:

  • पॉप सिंगर ब्रिटनी स्पीयर्सनं वडिलांच्या विरोधात दाखल केला होता खटला
  • न्यायालयात याचिका दाखल करत ब्रिटनीनं केली होती कंजरवेटरशिपमधून मुक्त करण्याची मागणी
  • न्यायालयानं ब्रिटनीची याचिका फेटाळत दिला वडिलांच्या बाजूनं निर्णय

मुंबई: अमेरिकेची पॉप सिंगर ब्रिटनी स्पीयर्स आणि तिचे वडील जेमी स्पीयर्स यांच्यातील वाद आता एवढे टोकाला गेले आहेत की, सोशल मीडियावरही त्याची चर्चा होताना दिसत आहे. ब्रिटनीनं तिच्या वडिलांच्या विरोधात खटला दाखल करत कंजरवेटरशिप म्हणजेच गार्जियनशिपमधून स्वातंत्र्य देण्याची मागणी केली होती. पण आता न्यायालयानं ब्रिटनीला मोठा झटका दिला आहे. ब्रिटनी हा खटला हारली असून तिला आता वडिलांच्या कंजरवेटरशिपमधून स्वातंत्र्य मिळणार नाहीये. कंजरवेटरशिपपासून स्वातंत्र्य मिळण्याची मागणी असलेली ब्रिटनीची याचिका न्यायालयानं फेटाळली आहे.

ब्रीटनी स्पीयर्स मागच्या १३ वर्षांपासून आपल्या वडिलांच्या कंजरवेटरशिपमध्ये आहे. २००८ मध्ये पती केविन फेडरलाइनपासून घटस्फोट घेतल्यानंतर ब्रिटनीच्या वडिलांना तिच्या वैयक्तीक आयुष्यापासून ते संपत्तीपर्यंत सर्व कायदेशीर अधिकार या कंजरवेटरशीपच्या माध्यमातून देण्यात आले. याआधी ब्रिटनीनं अमेरिकेच्या लॉस एंजेलिस न्यायालयात दिलेल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं होतं की, ‘१३ वर्षांपासून चालू असलेल्या या कंजरवेटरशिपपासून मला आता मुक्ती हवी आहे. यासोबतच मला माझं आयुष्य माझ्या मनाप्रमाणे जगण्याचा अधिकार दिला जावा. मी १३ वर्ष खूप सहन केलं आहे. आता हे सर्व खूप जास्त होत आहे.’


वडिलांवर खटला दाखल केल्यानंतरच्या सुनावणीमध्ये ब्रिटनीनं न्यायाधीशांना सांगितलं, ‘१३ वर्षांपासून मला जबरस्तीनं ड्रग्स दिले जात आहे. माझ्या मनाविरूद्ध माझ्याकडून काम करून घेतलं जात आहे. मला मुलांना जन्म देण्याचा अधिकारही नाहिए. मला केवळ माझं आयुष्य माझ्या मनाप्रमाणे जगायचं आहे. या कंजरवेटरशिपमुळे माझा फायदा नाही तर नुकसानच जास्त होत आहे. मलाही इतरांप्रमाणे स्वतंत्र आयुष्य जगण्याचा अधिकार आहे आणि मी असंच आयुष्य जगू इच्छिते.’


ब्रिटनी पुढे म्हणाली, ‘मला माझ्या बॉयफ्रेंडशी लग्न करायचं आहे पण वडिलांच्या कंजरवेटरशिपमुळे मला ना लग्न करता येत आहे ना मी मुलांना जन्म देऊ शकत. मला माझ्या शरीरातील बर्थ कंट्रोल डिव्हाइसपासून (IUD) मुक्तता हवी आहे. ज्यामुळे मी पुन्हा आई होऊ शकेन पण मला त्यासाठी डॉक्टरकडेही जाऊ दिलं जात नाही आहे.’ पण न्यायालयानं ब्रिटनीची याचिका फेटाळत तिच्या वडिलांच्या बाजूनं निर्णय दिला आहे. ज्यामुळे तिची ‘कंजरवेटरशिप’ वडिलांकडेच राहणार आहे.


दरम्यान ब्रिटनीला पाठींबा देण्यासाठी तिचे चाहतेही रस्त्यावर उतरले असून त्यांनी तिच्यासाठी ‘फ्री ब्रिटनी’ अशी चळवळ सुरू केली आहे. या चळवळीला जगभरातून प्रतिसाद मिळत आहे. अनेक चाहत्यांनी तसेच जगभरातील सेलिब्रेटींनी ब्रिटनीला आपला पाठींबा दर्शवला आहे. याशिवाय काही दिवसांपूर्वी ब्रिटनीच्या बहिणीनंही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिला पाठींबा दिला आहे.



[ad_2]

Source link