मुंबई : क्रिकेटचा सामना सुरु असताना चक्क साप मैदानात घुसल्याचे पाहायला मिळाले आहे. मैदानात साप आल्यामुळे हा सामना चक्क थांबवण्यात आला.
वांद्रे-कुर्ला संकुल येथे मुंबई आणि कर्नाटक यांच्यातील लढतींदरम्यान साप आल्याची घटना घडली होती. मैदानात साप आल्याचे कळताच खेळ थांबवण्यात आला आणि सर्प मित्राला बोलवण्यात आले. सर्प मित्राने साप पकडला आणि खेळ पुन्हा सुरु झाला.
या मैदानात फक्त एकच साप आला, असे सर्वांना वाटत असेल. पण या मैदानात दोन साप आले होते आणि या दोघांनीह पकडण्यात आले, अशी माहिती या सर्प मित्राने दिली.
क्रिकेटच्या मैदानात साप घसण्याची ही पहिलीच वेळ नाही. या मोसमाच्या सुरुवातीला विदर्भ आणि आंध्र प्रदेश यांच्यातील सामन्यातही साप आला होता
- Advertisement -