Home पोलीस घडामोडी बाबरी मशीद निकाल व ईद ए मिलाद च्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या सूचना

बाबरी मशीद निकाल व ईद ए मिलाद च्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या सूचना

0

सातारा : (डॉ विनोद खाडे)बाबरी मशीद निकाल व ईद ए मिलाद च्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या सूचना-येत्या काही दिवसात येणारा मुस्लीम बांधवांचा ईद ए मिलाद सण व बाबरी मशीद बाबत सर्वोच्च न्यायालयाचा लागणार असलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर
माण-खटाव नूतन उपविभागीय पोलिस अधिकारी बी बी महामुनी, वडूज चे पोलिस निरीक्षक अशोक पाटील व मायणी चे पोलीस उप निरीक्षक शहाजी गोसावी, आदींच्या
उपस्थिती मध्ये शांतता बैठक घेण्यात आली
वडूज पोलीस ठाणे हद्द, मायणी व इतर पोलिस स्टेशन हद्दीतील पोलीस पाटील, पोलीस मित्र, शांतता कमिटी सदस्यांची तसेच सर्व धर्मीय लोकांची मिटींग घेण्यात आली सदर मीटिंगमध्ये गावात व परिसरामधील कोणी जातीय तेढ निर्माण करणाऱ्या घटना घडणार असतील तर त्याबाबतची पूर्व माहिती संकलित करून तात्काळ पोलीस स्टेशनला कळविणे बाबत सूचना दिल्या. दंगा करणाऱ्या व्यक्तीवर लक्ष ठेवा तसे सोशल मीडियावर सदर निकालाचे अनुशंगाने कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील अशा प्रकारचे संदेश प्रसारित करू नयेत. निकालानंतर गुलाल उधळू नये, फटाके वाजवू नयेत. निकाला निमित्त पेढे, साखर वाटू नयेत. मिरवणुका, रॅली काढू नयेत भाषणबाजी / घोषणाबाजी करू नये कोणतेही वाद्य वाजवू नये. धार्मिक भावना दुखावण्याच्या बुद्धीस परस्पर उद्देशाने शब्द उच्चारू नयेत अशा सूचना दिल्या. मिटींगकरता 40 ते 45 असे हिंदू व मुस्लिम समाजाचे सदस्य, प्रतिष्ठीत नागरीक, उपस्थित होते.