हायलाइट्स:
- धनुष आहे सुपरस्टार रजनीकांत यांचा जावई
- रजनीकांत यांच्या शेजारी धनुष बांधणार नवीन आलिशान घर
- नवीन घरासाठी धनुष करणार १५० कोटी रुपयांचा खर्च
आजी म्हणायची ‘अब्दुर रहमान’, मग कसं बदललं किंग खानचं नाव
धनुष्य चेन्नईतील पोएस गार्डन परिसरात घर बांधत आहे. त्यासाठी त्याने तेथील १९००० स्वेअर फूट जमीन विकत घेतली आहे. नुकतंच या जागेचं भूमिपूजनही करण्यात आलं. या सोहळ्यासाठी खुद्द रजनीकांतही उपस्थित होते. या जागेत घर बांधण्यासाठी धनुष १५० कोटी रुपये खर्च करणार असून खर्चाचा आकडा वाढण्याचीही शक्यता आहे. धनुषचं हे घर चार मजली असणार आहे. घर अत्यंत हटके पद्धतीने बांधण्यात येणार असून घरात सगळ्या सुखसोयी असणार आहेत. स्विमिंग पूलपासून जिमपर्यंत प्रत्येक गोष्ट घरात असणार आहे. महत्वाचं म्हणजे धनुषचं घर रजनीकांत यांच्या घरापासून अगदी शेजारी असणार आहे.
सध्या धनुष अमेरिकेत आपल्या आगामी वेबसीरिजचं चित्रीकरण करण्यात व्यस्त आहे. या वेबसीरिजचं नाव आहे ‘द ग्रे मॅन’. धनुषचे मागील अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले आहेत. वेबसीरिजसोबतच धनुष आनंद एल राय यांच्या ‘अतरंगी रे’ चित्रपटातही झळकणार आहे. या चित्रपटात धनुषसोबत अक्षय कुमार आणि सारा अली खानही असणार आहे. धनुषने २००४ साली रजनीकांत यांच्या मुलीसोबत लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाला अनेक बड्या व्यक्तींनी हजेरी लावली होती. सुरक्षा व्यवस्थादेखील खूप कडक होती. निमंत्रण पत्रिका दाखवल्याशिवाय कुणालाही आत प्रवेश दिला जात नव्हता.
लहानपणी खेळत असताना रणबीरनं असं काही केलं की…नीतू कपूर यांनी सांगितला किस्सा