Home बातम्या आंतरराष्ट्रीय बाबो! ७.५ लाख रूपयांना विकला गेला द्राक्षांचा एक गढ, खायचे की शोकेसमध्ये ठेवायचे?

बाबो! ७.५ लाख रूपयांना विकला गेला द्राक्षांचा एक गढ, खायचे की शोकेसमध्ये ठेवायचे?

जपानमध्ये काहीही होऊ शकतं यावर तुमाचाही विश्वासही बसेल. जपानमधील अनेक आश्चर्यकारक घटना समोर येत असतात. आता हीत बघा ना. इथे द्राक्षांचा एक गुच्छा १.२ मिलियन येन(७.५ लाख रूपये) ला विकला गेला. आता तुम्ही म्हणाल एवढी किंमत का? चला जर जाणून घेऊ याबाबत…

द्राक्षाच्या या प्रजातीला रूबी रोमन असं नाव आहे. १२ वर्षांपूर्वी द्राक्षांची ही प्रजाती बाजारात आली होती. कनाजावा बाजारात या द्राक्षावर रिकॉर्ड ब्रेक बोली लावण्यात आली. द्राक्षांचा हा गढ ह्याकुराकुसो नावाच्या एका कंपनीने खरेदी केला आहे.

रूबी रोमन नावाच्या या द्राक्षांचा आकार सामान्य द्राक्षांपेक्षा मोठा असतो. हे द्राक्ष टेस्टला फार गोड आणि रसीले असतात. द्राक्षांची ही प्रजाती जपानच्या इशिकावा प्रांतातील सरकार कमी प्रमाणात उगवते.

या द्राक्षांच्या एका गढात ३० द्राक्ष असतात. एका द्राक्षाचं वजन साधारण २० ग्रॅम इतकं असतं. इशिकावा सहकारी समितीकडून सांगण्यात आलं आहे की, ते सप्टेंबरपर्यंत रूबी रोमन प्रजातीच्या द्राक्षांच्या २६ हजार गढांची निर्यात करतील.