बारामती तालुक्यातील शारदानगर येथे आयोजित करण्यात आलेले ‘कृषिक’ प्रदर्शन आंतरराष्ट्रीय स्तरावरचे प्रदर्शन

- Advertisement -

परवेज शेख बारामती तालुक्यातील शारदानगर येथे आयोजित करण्यात आलेले ‘कृषिक’ प्रदर्शन आंतरराष्ट्रीय स्तरावरचे प्रदर्शन आहे. जगभरातील नवनवे तंत्रज्ञान येथील शेतीच्या प्रात्यक्षिकांमधून शेतकऱ्यांपर्यंत पोचवले जाते.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी बारामतीतील अद्ययावत शेती तंत्राची तसेच शेतीच्या नवीन तंत्राचा अवलंब केलेल्या शेती प्रात्यक्षिकांची पाहणी करून तेथील विविध शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि प्रगतशील शेतकऱ्यांसोबत संवाद साधला.

शेतकऱ्यांचे शेतीचे पारंपरिक ज्ञान अचंबित करणारे आहे. त्यांच्या ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी प्रयत्न केला जाईल तसेच राज्यातील शेतकऱ्यांना ताकद देऊन महाराष्ट्राला सुजलाम् सुफलाम् करणार असल्याचं निर्धार मा. मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

यावेळी कृषिमंत्री दादा भुसे जी, पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार जी, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम जी, खासदार सुप्रिया सुळे जी, आमदार रोहित पवार जी, आमदार धीरज देशमुख जी, सिनेअभिनेता अमीर खान जी उपस्थित होते.

- Advertisement -