Home पोलीस घडामोडी बालात्कारातील फरारी आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक

बालात्कारातील फरारी आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक

0

पनवेल : खारघर पोलीस ठाण्यात दि. ३० ऑगस्ट रोजी बलात्कारात गुन्ह्यातील फरारी आरोपीला नवी मुंबई आयुक्तालय अंतर्गत अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाकडून दि. १३ रोजी हरिद्वार येथुन अटक केली आहे . संबंधित आरोपीला अटक करून खारघर पोलिसांच्या ताब्यात  दिले आहे. 

संबधित आरोपीचा शोध घेण्यासाठी अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष अधिका-यांचे विशेष पथक तयार करण्यात आले होते .  आरोपीचा शोध घेण्यासाठी हे पथक सर्वप्रथम आसाम त्यांनतर आरोपीचा मूळ गाव असलेल्या शामली उत्तर प्रदेश याठिकाणी गेले . मात्र आरोपी हा हरिद्वार येथे असल्याची माहिती सूत्रांनी या शोधपथकाला दिली. हरिद्वार  स्टेशन परिसरातून सकाळी ७ च्या सुमारास आरोपीला सापळा रचून अटक केली . उपायुक्त प्रवीणकुमार पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त अजय कदम यांच्या मार्गदर्शनानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन गरड यांच्या पथकाने हि कारवाई केली आहे.

सुशीलकुमार  रमेशचंद्र चौहान (४३)  असे या  आरोपीचे नाव आहे . तांत्रिक मांत्रिक म्हणून हा आरोपी घरात दाखल झाला होता . त्यांनतर संबंधित फिर्यादीला भूतबाधा झाल्याचे भासवत आरोपीने गुंगीचे औषध देऊन फिर्यादीवर बलात्कार केला होता . अटक केलेला आरोपी गुन्ह्यातील मुख्य आरोपी आहे. या गुन्ह्यातील आणखी दोन आरोपीचा शोध सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जून गरड यांनी दिली .