Home शहरे मुंबई ‘बाळासाहेबांचे नाव लपून छपून नको’

‘बाळासाहेबांचे नाव लपून छपून नको’

0
‘बाळासाहेबांचे नाव लपून छपून नको’

[ad_1]

म. टा. वृत्तसेवा, पनवेलः पनवेलमधील उलवे नोड येथे कोविड केअर सेंटरच्या उद्घाटनासाठी आलेले राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळाच्या नावाबाबत सावध भूमिका घेतली आहे. ‘करोनाच्या संकटात बाळासाहेबांचे नाव लपूनछपून नको, द्यायचेच आहे तर उघडपणे द्या,’ असे बोलून दि. बा. पाटील यांच्या नावाला पाठिंबा अगर बाळासाहेबांच्या नावाला विरोध… याबाबत थेट भाष्य न करता सावध भूमिका घेतली आहे. ‘हा विषय करोना संपल्यावर’, असे सांगून यावर अधिक भाष्य केले नाही.

सिडकोने प्रस्तावित नवी मुंबई विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ‘मटा’ने हे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर स्थानिकांनी प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांच्या नावाचा आग्रह पुन्हा धरला आहे. बाळासाहेबांच्या नावाला आमचा विरोध नाही, मात्र स्थानिक प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचेच नाव विमानतळाला देण्यात यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. आमदार प्रशांत ठाकूर सिडकोचे अध्यक्ष असताना त्यांनी हा प्रस्ताव मांडून ‘दिबां’चे नाव का पुढे केले नाही, असा प्रश्नदेखील विरोधक विचारत आहे. भाजपचे आमदार महेश बालदी यांनी उलवे नोड येथील मोरू नारायण म्हात्रे विद्यालयात ६० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. या सेंटरच्या उद्घाटनाला माजी मुख्यमंत्र्यांच्या समोर बालदी यांनी ‘दिबां’चे नाव न देता बाळासाहेब ठाकरेंचे नाव देण्यास महाविकास आघाडीने हालचाली सुरू केल्या आहेत, महाराष्ट्रात साडेबारा टक्के नियम लागू करणाऱ्या ‘दिबां’चेच नाव विमानतळाला द्यावे अशी भूमिका मांडली. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भाषणात शेवटच्या एक मिनिटात हा उल्लेख केला.

‘दि. बा. पाटील यांचा सन्मान होणे आवश्यक आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उत्तुंग व्यक्ती आहेत, त्यामुळे त्यांचे नाव लपूनछपून देऊ नये. विमानतळाला लपूनछपून नाव देण्याचा प्रयत्न केला जात आहे. बाळासाहेब ही खूप मोठी व्यक्ती आहे, त्यांचे नाव देताना वादविवाद नको,’ अशी सावध भूमिका घेऊन त्यांनी दिबा किंवा ठाकरे यांच्या नावाला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली नाही. पुढे त्यांनी याबाबत मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील, अशी जोड दिली. आता आपण कोविडशी लढा देऊ, आज मला याबाबत काही बोलायचे नाही. कोविड संपल्यानंतर आपण या विषयावर बोलू, असे सांगून त्यांनी या विषयावर बोलणे टाळले.

[ad_2]

Source link