Home ताज्या बातम्या ‘बाळासाहेबांना राणेंची उंची माहीत होती म्हणूनच मुख्यमंत्रीपदी बसवलं’

‘बाळासाहेबांना राणेंची उंची माहीत होती म्हणूनच मुख्यमंत्रीपदी बसवलं’

0
‘बाळासाहेबांना राणेंची उंची माहीत होती म्हणूनच मुख्यमंत्रीपदी बसवलं’

हायलाइट्स:

  • नारायण राणेंना केंद्रात मंत्रिपद
  • खासदार संजय राऊत यांची टिप्पणी
  • प्रवीण दरेकर यांचं प्रत्युत्तर

मुंबईः मोदी सरकारमध्ये महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यासह चार नव्या मंत्र्यांचा समावेश झाला आहे. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी टिप्पणी करत राणेंना जे पद मिळालं, त्यापेक्षा त्यांची उंची मोठी आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांच्या प्रतिक्रियेवर बोट ठेवत भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. ‘नारायण राणेंना मिळालेले खाते छोटे आहे की मोठे हे येणाऱ्या काळामध्ये ते त्यांच्या कामातून दाखवून देतील, असा विश्वास यावेळी दरेकरांनी व्यक्त केला आहे.

भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबरोबर एकनाथ खडसे यांच्या ईडी चौकशीवरही भाष्य केलं आहे. तसंच, संजय राऊत यांच्यावरही जोरदार निशाणा साधला आहे. संजय राऊत हे प्रसारमाध्यमातून भाजपवर टीका करणे या पलीकडे अभ्यास करताना दिसत नाही. राऊत यांना राणे दोषाची कावीळ झाली असुन त्यांना राणेंचे खाते छोटेच वाटणार असा, टोला दरेकरांनी लगावला आहे.

आईचा खून करुन अवयव भाजून खाण्याचा प्रयत्न; नराधम मुलाला फाशीची शिक्षा

‘संजय राऊतांना नारायण राणेंना काही मिळाले तरी ते छोटेच वाटणार याची कल्पना आम्हाला आहे. बाळासाहेब ठाकरे यांना राणे साहेबांची उंची माहीत होती. त्यामुळेच त्यांनी राणे साहेबांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसवलं होतं. परंतु आता संजय राऊत यांना राणे दोषाची कावीळ झाली आहे. राणे यांना मिळालेले खाते छोटे आहे, की मोठे हे येणाऱ्या काळामध्ये राणे त्यांच्या कामातून दाखवून देतील. त्यांना कोणतही खाते दिलं असतं तरी त्या खात्याला वजन प्राप्त करत जनतेला मदत करायचं काम त्यांनी नक्की केलं असतं,’ असा विश्वास दरेकर यांनी व्यक्त केला आहे.

नागपुरात वादळी पावसाचा इशारा; हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी

‘ईडी चौकशी आणि छापेमारी यांचा संबंध राजकारणाशी लावणे चुकीचे आहे. एखाद्या व्यक्तीवर संशय आल्यावर कारवाई होत असते, असं दरेकर यांनी म्हटलं आहे. ईडीची कारवाई कोणत्याही सुडभावनेने होतं नसते. तपास यंत्रणा स्वायत्त असून त्यांच्या पद्धतीने ते काम करतात. त्यामुळे यामध्ये विनाकारण राजकारण करत मूळ विषयापासून पळ न काढता खडसे यांनी चौकशीला समोरं जायला हवं. कुठलीही व्यक्ती चौकशीपासून पळ काढुन आपल्या बचावाकरीता मार्ग शोधत असते. तेव्हा या सर्व प्रकरणातुन संशयाला बळकटी मिळते. आपला जर दोष नसेल तर योग्य ती कागदपत्र सादर करून आपलं निर्दोषत्व सिद्ध करत कोणत्याही चौकशीला सहकार्य करणं उत्तम ठरेल,’ असे मत यावेळी दरकेर यांनी व्यक्त केलं.

आठ दिवसांपासून जळगावात ‘कुछ होने वाला है’चे मेसेज फिरत होते: एकनाथ खडसे

Source link