Home मनोरंजन बिग बजेट चित्रपटांची नायिका… पूजा हेगडेच्या ‘या’ चित्रपटांची उत्सुकता

बिग बजेट चित्रपटांची नायिका… पूजा हेगडेच्या ‘या’ चित्रपटांची उत्सुकता

0
बिग बजेट चित्रपटांची नायिका… पूजा हेगडेच्या ‘या’ चित्रपटांची उत्सुकता

[ad_1]

पुणे टाइम्स टीम

बॉलिवूडसह दाक्षिणात्य इंडस्ट्रीतही पूजा हेगडे या नावाला वेगळं ग्लॅमर आहे. तिच्या हाती उत्तमोत्तम चित्रपट आहेत. चित्रपटांचं काम सुरू होताच पूजाची सध्या ‘राधेशाम’ आणि ‘बिस्ट’ या चित्रपटांसाठी धावपळ सुरू आहे. या दोन्ही चित्रपटांचं काम तिनं सुरू केलं आहे.

पूजा नुकतीच हैदराबाद इथं परतली. तिथं तिनं प्रसिद्ध अभिनेता प्रभासबरोबर ‘राधेशाम’ चित्रपटाचं काम सुरू केलं आहे. या चित्रपटात ती प्रभासची नायिका असून ही प्रेमकथा असल्याचं कळतंय. राधेकृष्णाकुमार या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणासह ती ‘बिस्ट’ चित्रपटातल्या गाण्यासाठी सराव सत्रांना हजेरी लावत आहे. एकीकडे दक्षिणेतले बिग बजेट चित्रपट हाती असताना पूजाला बॉलिवूडमध्येही उत्तम कथांसाठी विचारणा होत आहे. रणवीरसिंहसोबत ती ‘सर्कस’ या चित्रपटात दिसणार आहे.


सलमान खानसोबत आगामी चित्रपटातही तिची वर्णी लागली आहे. ‘आचार्य’ या दाक्षिणात्य चित्रपटात ती चिरंजिवी आणि राम शरण यांच्यासोबत; तर थलपथी विजयसोबत ‘मोस्ट इलिजिबल बॅचलर’ आणि ‘बिस्ट’ असे चित्रपट ती करत आहे. यंदाच्या सर्वाधिक व्यग्र अभिनेत्रींमध्ये तिचं नाव घेतलं जातंय. हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय कमाल करतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.



[ad_2]

Source link