काय नवीन गोष्टी
‘बिग बॉस’ कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून नेहमीच उदंड प्रतिसाद मिळत असतो. आतापर्यंत या कार्यक्रमाची १४ पर्व प्रसारित झाली आहेत. या सर्व पर्वांचा कालावधी हा तीन महिन्यांचा होता. मात्र कार्यक्रमाच्या १५ व्या पर्वामध्ये या कालावधीबद्दल निर्मात्यांनी सर्वात मोठा बदल केला असून हे पर्व आता सहा महिने दाखवले जाणार आहे. अर्थात सुरुवातीचे सहा आठवडे बिग बॉस कार्यक्रम ओटीटी प्लॅटफॉर्म म्हणजेच वूट वर रिलीज केला जाणार आहे. वूटवर हा कार्यक्रमाचा प्रिमियर होणार असून त्याला सध्या ‘बिग बॉस ओटीटी’ असे म्हटले जाणार आहे. त्यानंतर सहा आठवड्यानंतर हा कार्यक्रम टीव्हीवरही दिसणार आहे. अशा प्रकारचा प्रयोग पहिल्यांदाच होत आहे. हा कार्यक्रम वूटवर दिसणार असल्याने प्रेक्षकांना तो कधीही कुठेही बघता येणार आहे.
कार्यक्रमातील आणखी एक बदल म्हणजे बिग बॉसच्या या १५ व्या पर्वामध्ये सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग असणार आहे. म्हणजे टीव्हीवरील प्रसिद्ध कलाकारांसोबत सर्वसामान्य प्रेक्षकांना देखील त्यामध्ये सहभागी होता येणार आहे. या कार्यक्रमाममध्ये काही लोकप्रिय जोड्या स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहेत.