हायलाइट्स:
- अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर चर्चेत
- बिग बॉसच्या घरात जाणार असल्याच्या चर्चा
- अभिनेत्रीने केला खुलासा
या मालिकेतली तिची पम्मी ही भूमिकाही प्रेक्षकांना आवडली आता अपूर्वाने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ती पुन्हा एकदा ‘रात्रीस खेळ चाले’ च्या तिसऱ्या पर्वात दिसणार होती. परंतु लॉकडाऊनमुळे आलेल्या निर्बंधांमुळे मालिकेचं शूटिंग थांबलं आहे. त्यामुळे अपुर्वा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला केव्हा येणार? असा प्रश्न तिचे चाहते विचारतायत.
अपूर्वा नेमळेकर उर्फ शेवंता अभिनयाव्यतिरिक्त हटके स्टाइलसाठीही ओळखली जाते. अपूर्वा सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसोबत आपले सुंदर – सुंदर फोटो शेअर करत असते. अपूर्वानं आपल्या मोहक सौंदर्याने प्रेक्षकांचे हृदय जिंकले आहे. इन्स्टाग्रामवर अपूर्वाचे मोहक, ग्लॅमरस, स्टायलिश अवतारातील फोटो पाहायला मिळतात. तसंच ती सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकता तिनं चाहत्यांशी गप्पा मारल्या. चाहत्यांच्या प्रश्नांना अपूर्वानं दिलखुलास पद्धतीनं उत्तरं दिली.
एका चाहत्यानं अपूर्वाला बिग बॉस मराठीच्या आगामी पर्वात दिसणार का? असा प्रश्न विचारला.जराही विलंब न करता अपूर्वानं थेट नाही असं उत्तर देऊन टाकलं. ‘ नाहीच…मी एक अभिनेत्री आहे, मला वेगवेगळ्या भूमिका साकारायच्या आहेत’, असं अपूर्वानं म्हटलं आहे.