Home गुन्हा बिबवेवाडीतील सराईत गुन्हेगार दोन वर्षासाठी तडीपार

बिबवेवाडीतील सराईत गुन्हेगार दोन वर्षासाठी तडीपार

0

परवेज शेख दि.19/02/2020 बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.कुमार घाडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार,बिबवेवाडी पोलीस ठाणेचे रेकॉर्डवरील गुन्हेगार १) टोळी प्रमुख – रितेश विजय कोंढरे (वय २२, रा.लोअर इंदिरानगर बिबवेवाडी पुणे), २) टोळी सदस्य – अनिकेत उर्फ आंडया विजय कोंढरे (वय २०, रा.लोअर इंदिरानगर,बिबवेवाडी,पुणे) यांच्यावर बिबवेवाडी पोलीस ठाण्यात दुखापत करणे, गाडयांची तोडफोड करुन जनमानसात दहशत पसरवणे यांसारखे गुन्हे दाखल असल्याने त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५५ प्रमाणे तडीपार प्रस्ताव मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ – ५ पुणे शहर श्री.सुहास बावचे यांच्याकडे सादर केला होता. त्यानुसार मा.पोलीस उपायुक्त परिमंडळ – ५ पुणे शहर श्री.सुहास बावचे यांनी नमुद आरोपाना त्यांच्या कार्यालयीन आदेश क्र.०४/२०२० दि.१९ फेब्रुवारी २०२० अन्वये कलम ५५ प्रमाणे पुणे शहर पोलीस आयुक्तालय व पुणे जिल्हयाच्या हद्दीमधुन दोन वर्षाकरीता तडीपार करण्यात आले आहे.

सदरची कारवाई,मा.पोलीस उप-आयुक्त परिमंडळ – ०५ पुणे शहर श्री.सुहास बावचे यांच्या मार्गदर्शनाखाली बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.कुमार घाडगे यांचे सुचने नुसार पोलीस शिपाई श्री.रुपनर, पोलीस शिपाई श्री.शेडगे यांच्या पथकाने केली आहे.