Home ताज्या बातम्या बिबवेवाडीत उबेरच्या सीएनजी गाडीने घेतला पेट

बिबवेवाडीत उबेरच्या सीएनजी गाडीने घेतला पेट

0

बिबवेवाडीत उबेरच्या सीएनजी गाडीने घेतला पेट

पुणे शहर बिबवेवाडी रोझरी शाळे शेजारील बस स्टॉप, वसंत बाग, पुणे याठिकाणी आज दुपारी 3:00 वा.सुमारास उबेर कंपनीकडे कामाला असलेले शेरोलेट सीएनजी बीटगाडीने अचानक पेट घेतला. अग्निशामक दलाला आगीचे वर्दी मिळताच घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणत आग विझवली.
परिसरात सीएनजी शेरोलेट बीट चारचाकी गाडीला आग लागण्याची बातमी पोलिसांना कळताच बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे घटनास्थळी दाखल होत घटनेची माहिती घेतली.
सदर घटनेचा पुढील तपास बिबवेवाडी पोलीस नाईक पाटोळे करत आहेत.

शनिवार दिनांक 14 सप्टेंबर 2019 रोजी दुपारी 3:00 वा. सुमारास रोझरी शाळेच्या शेजारील बस स्टॉप जवळ, बिबवेवाडी, पुणे उबेर कंपनीकडे कामाला असलेली शरोलेट चारचाकी गाडी क्रमांक. MH-14-GD-5783 गाडीचे मालक सचिन सकट हे आहेत. शरोलेट बिट आग लागलेल्या गाडीला अग्निशामक दलाची मदत पोहोचण्यापूर्वी नागरिकांनी लगतच्या टीव्हीएस प्रसन्ना दुचाकी मधील डी.सी.पी फायर एक्टीग्वीसरचा मारा करून आग विझविण्याचा प्रयत्न केले असल्याचे दिसून आले. अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचले असता जवानांनी काही वेळातच आग विझवली. आग लागलेली शेरोलेट बीटगाडी ही श्री टूर्स अँड ट्रॅव्हल्सची असून उबेर कंपनीकडे कामास लावलेली आहे. उबेर कॅब चालक नाथा मोहिते (वय 30, राहणार. संत तुकाराम नगर,डी.वाय.पाटील,पिंपरी) यांनी सांगितले की सदर गाडी कस्टमरला पिकअप करण्यासाठी जात असताना गाडीच्या मागच्या बाजूस आग लागल्याचे समजल्याने त्याने गाडी रस्त्याच्या बाजूला घेतली. उबेरची शरोलेट बीट चारचाकी गाडी सीएनजी किटवर चालणारी असून सदर आगीत कारच्या मागील पेट्रोल टॅंक वरील फायबर, वायरिंग, पाईप आदि जळून एकूण अंदाजे 60 हजार रुपयाचे नुसकान झाले. शरोलेट बिट गाडीला आग लागल्याचे निश्चित कारण समजू शकले नाही. सदर आगीत कोणीही जखमी झाले नाही.

सदरची कामगिरी, 
कात्रज अग्निशामक दलाचे अधिकारी- संजय रामटेके,वाहनचालक- सब्बी शेख,तांडेल-संजीवन ढवळे,फायरमन-वसंत भिलारे,भरत वाडकर,किरण पाटील,देवदूत- सागर इंगळे,रोहित जाधव,राहुल मालुसरे,तानाजी जाधव यांनी केली
.