Home शहरे अकोला बिर्ला क्रीडा केंद्राचा पुनर्विकास; नव्या वास्तुचे ‘मराठी नाट्य विश्व संग्रहालय’ नामकरण करण्यास मान्यता – नगरविकास विभागाचा निर्णय

बिर्ला क्रीडा केंद्राचा पुनर्विकास; नव्या वास्तुचे ‘मराठी नाट्य विश्व संग्रहालय’ नामकरण करण्यास मान्यता – नगरविकास विभागाचा निर्णय

0
बिर्ला क्रीडा केंद्राचा पुनर्विकास; नव्या वास्तुचे ‘मराठी नाट्य विश्व संग्रहालय’ नामकरण करण्यास मान्यता – नगरविकास विभागाचा निर्णय

मुंबई, दि. 16 :- मुंबई महानगरातील बिर्ला क्रीडा केंद्राचा पुनर्विकास करुन मराठी रंगमंच कलादालनाकरिता उभारण्यात येणाऱ्या वास्तूचे ‘मराठी नाट्य विश्व संग्रहालय’ करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच नगरविकास विभागाने जारी केला आहे.

शहरातील बिर्ला क्रीडा केंद्राच्या वास्तुचा पुनर्विकास करुन मराठी रंगमंच कलादालनाच्या एकमेवाद्वितीय अशा वास्तुच्या निर्मितीकरिता १५ फेब्रुवारी २०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) यांच्या अध्यक्षतेखाली विषय समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सप्टेंबर महिन्यात बैठक झाली, या बैठकीत बिर्ला क्रीडा केंद्राचा पुनर्विकास करुन मराठी रंगमंच कलादालनाकरिता उभारण्यात येणाऱ्या वास्तूचे ‘मराठी नाट्य विश्व संग्रहालय’ करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी दिले होते, त्यानुसार नगरविकास विभागाने या केंद्राचे ‘मराठी नाट्य विश्व संग्रहालय’ नामकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

००००००

किशोर गांगुर्डे/विसंअ/