Home शहरे बीड बीडमध्ये अनैतिक संबंधातून साडेतीन वर्षे मुलाचा खून

बीडमध्ये अनैतिक संबंधातून साडेतीन वर्षे मुलाचा खून

मंगळवार रोजी सकाळी करपरा नदी ला एका साडेतीन वर्षाच्या मुलाचा मृतदेह असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनला दिली असता पोलीस निरीक्षक पूर्भे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व शव विच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला असता त्यांना माहिती मिळाली की शिवाजीनगर भागात राहणाऱ्या एका महिलेचा मुलगा सोमवार 24 तारखेपासून बेपत्ता होता त्यांनी त्या महिलेला संपर्क करून मृतदेहाची ओळख पटविली असता त्या महिलेने हा मुलगा माझाच असल्याची कबुली दिली. त्याचा खून झाला असल्याचा जबाब दिला.
याबाबत अधिक माहिती अशी की शिवाजीनगर भागात राहणारी एक महिला नामे अनिता विष्णू देवगुंडे वय 40 वर्ष या महिलेला तीन मुले आहेत हिचा पती भोळसर स्वभावाचा असल्यामुळे काही दिवसापूर्वी श्रीराम शिंदे नामक एका व्यक्ती सोबत तिचे सुत जुळले असता श्रीराम शिंदे यांची पत्नी श्यामल श्रीराम शिंदे यांचे नेहमीच भांडण होत असे. सोमवारी रात्रीपासून आणीता देवगुंडे चा मुलगा सार्थक देवगुंडे तीन वर्षे नऊ महिने हा बेपत्ता झाला होता त्यामुळे आज सकाळी करपरा नदीत सापडल्याने पोलिसांनी आणि त्याला संपर्क केला असता मुलाची ओळख पटवीण्यास सांगितली त्यावेळी हा मुलगा माझाच असून माझ्या मुलाचा खून झाला असल्याचा आरोप केला आहे व त्याचा खून शामल श्रीराम शिंदे या महिलेने केला असा आरोप अनिता देवगुंडे यांनी केला आहे केला आहे पुढील तपास शिवाजीनगर पोलीस ठाणे करत आहे