Home शहरे अमरावती बुलडाणा जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून दारू दुकानांतील स्टोकची मोजणी

बुलडाणा जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून दारू दुकानांतील स्टोकची मोजणी

0

खामगाव येथील चौधरी वाईन शॉप , हॉटेल पवन , हॉटेल पेराडाईज , हॉटेल गौरव वाईन बारची तपासणी

बुलडाणा
बुलडाणा ( दि 24 एप्रिल 20 ) – राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने खामगाव शहरातील दारू दुकाने व वाईन बार मधील लोकडवून दरम्यान व दुकान सिल केल्यानंतर असलेल्या साठ्यात तफावत आहे का ? या संदर्भात कालपासून धडक मोहीम सुरू करण्यात आली . चौधरी वाईन शॉप वर काल सायंकाळी पथक दाखल झाले .यावेळी चौधरी यांच्या वाईन शॉपची रात्री 12 वाजेपर्यंत तपासणी करण्यात आली यावेळी पथकाला रेकॉर्डमधील नोंदीपेक्षा देशी विदेशी दारूचा साठा कमी आढळल्याने त्याचा अहवाल तयार करण्यात आला आहे . अनुदप्ती अंतर्गत तृटी आढळल्याने चौधरी यांच्या विरुध्द विभागीय प्रकरणाची नोंद करून संबंधित अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे . अशी माहिती बुलडाणा , चिखली व खामगाव येथील पथकाचे मार्गदर्शक व निरीक्षक गणेश आर. गावंडे यांनी दिली . तसेच पथकाने आज खामगाव येथील एमआयडीसी भागातील हॉटेल पवन वाईन बार , सुटाळा येथील हॉटेल गौरव वाईन बार यासंह शेगांव रोडवरील हॉटेल पेराडाईज वाईन बार आदि ठिकाणी जाऊन मालाची तपासणी केली . या पथकात निरीक्षक शेवाळे , दुय्यम निरीक्षक बरडे , दुय्यम निरीक्षक आढळकर , बुलडाणा येथील दुय्यम निरीक्षक मुंगळे , खामगाव येथील निरीक्षक नरेंद्र मावळे , व चिखली येथील एस. बी. चव्हाण यांनी सहभाग घेतला .