Home ताज्या बातम्या बॅन्क्वेट हॉलमध्ये करा लसीकरण; हॉटेल असोसिएशनचा प्रस्ताव

बॅन्क्वेट हॉलमध्ये करा लसीकरण; हॉटेल असोसिएशनचा प्रस्ताव

0
बॅन्क्वेट हॉलमध्ये करा लसीकरण; हॉटेल असोसिएशनचा प्रस्ताव

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

करोना संकटातून मार्ग काढण्यासाठी जलद लसीकरण हा एकमेव पर्याय आहे. हे लसीकरण झपाट्याने होण्यासाठी बॅन्क्वेट हॉलना लसीकरण केंद्रांमध्ये परावर्तित करा, अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांनी केली आहे.

वेगवेगळ्या हॉटेल्समधील बॅन्क्वेट हॉल सध्या मोकळे आहेत. मागणीअभावी त्यांचे बुकिंग बंद आहे. त्यामुळे या मोकळ्या असलेल्या मोठ्या जागांचा लसीकरणासारख्या कामासाठी चांगला उपयोग होऊ शकतो, असे भारतीय हॉटेल व रेस्टॉरेंट असोसिएशन महासंघाने (एफएचआरएआय) म्हटले आहे. यासंबंधी त्यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे.

याबाबत महासंघाचे उपाध्यक्ष गुरबक्षिससिंग कोहली यांनी सांगितले की, ‘आपल्या देशात जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरू आहे. पण, या लसीकरणाला वेग येण्याची गरज आहे. त्यासाठी लसीकरण केंद्रेदेखील अधिक हवीत. त्यासाठी हॉटेल्समधील बॅन्क्वेट हॉल, हे सर्वोत्तम पर्याय असतील. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लसीकरणासंबंधीच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये आवश्यक ते बदल करून यासाठी परवानगी द्यावी.’

करोना संकटाचा हॉटेल उद्योगावर भीषण परिणाम झाला. एकट्या मुंबईतील ३० टक्के हॉटेल्स बंद पडली. २०१९-२० मध्ये १.८२ लाख कोटी रुपयांची असलेली या क्षेत्रातील उलाढाला २०२०-२१ या आर्थिक वर्षात १.३० लाख कोटी रुपयांवर आली. तर आता २०२१च्या या पहिल्या तिमाहितील उलाढाल २० टक्क्यांहून कमी आहे. सध्या देशभरातील हॉटेल रिकामी असल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत रिकाम्या जागी लसीकरण केंद्र उभे करून व्यावसाय जगताने (कॉर्पोरेट्स) त्यांच्या कर्मचाऱ्यांचे तेथे लसीकरण पूर्ण करावे, असे महासंघाचे म्हणणे आहे.

Source link