Home ताज्या बातम्या बेकायदा-अनधिकृत सिक्युरिटी एजेन्सी च्या मालकांवर कठोर कायदेशीर कारवाई करणार – पोलीस उप-अधीक्षक अनिल लाबांते

बेकायदा-अनधिकृत सिक्युरिटी एजेन्सी च्या मालकांवर कठोर कायदेशीर कारवाई करणार – पोलीस उप-अधीक्षक अनिल लाबांते

0

पुणे : परवेज शेख बेकायदा-अनधिकृत सिक्युरिटी एजेन्सी च्या मालकांवर कठोर कायदेशीर कारवाई करणार – पोलीस उप-अधीक्षक अनिल लाबांते
पुणे : दिनांक २६ नोव्हेंबर २०१९: रोजी मा. पोलीस अधीक्षक संदीप पाटील (भापोसे) यांच्या मार्गदर्शनाखाली मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक घनवट साहेब, नलावडे साहेब व सहाय्यक पोलीस निरीक्षक माने साहेब तसेच भारत शिल्ड फोर्सचे संस्थापक सचिन मोरे व पुणे जिल्हा आणि पुणे शहर येथील सुरक्षा रक्षक सेवा पुरवठादार संस्थेचे शेकडोहून मालक आणि चालक कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित होते.


पुणे पोलीस व खाजगी सुरक्षा रक्षक संस्था यांचे संयुक्त विद्यमाने पोलीस प्रायव्हेट सिक्युरिटी पार्टनरशीप प्रोग्रॅम पी-४ हा कार्यक्रम पोलीस अधीक्षक कार्यालयात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन मा. सचिन मोरे यांनी केले.

खाजगी सुरक्षा रक्षक संस्थेच्या वतीने सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी आपल्या मनोगतात सचिन मोरे यांनी सांगितले कि जगाच्या नकाशावर पुणे हे खूप वेगाने विकासाच्या दिशेने वाढणारे शहर असल्याने आय. टी. कंपन्या, मेट्रो, स्मार्ट सिटी होत असतानाच अद्ययावत अशा प्रशिक्षित सुरक्षा रक्षकांना पोलिसांशी मैत्रीचे संबंध तयार करून एक आदर्श सुरक्षा प्रणाली विकसित होणे गरजेचे आहे. पी-४ उपक्रमामुळे गुन्ह्याचे प्रमाण रोखण्यास मदत होईल आणि वेळोवेळी पोलीस प्रशासनाला मनुष्यबळ गरजेच्या वेळी सुरक्षा रक्षक संस्थेचा वतीने योग्यती मदत केली जाईल.


मा.बालाजी माने,बळवंत सिंग मेहता,रामकिशन बेंद्रे,राज राठोड, दिलीप सोनावणे,विजय पाचंगे,तानाजी भोसले यांनी एक देशसेवा आहे त्यातून आपले पुणे आपण स्वतः सुरक्षित करू शकतो. गर्दीचे व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, विशेष सुरक्षा पुरविण्याच्या कामी आम्ही मदत करतो आहे तसेच कोणत्याही सणादरम्यान कोणतेही गालबोट लागू नये,अफवांवर विश्वास ठेवू नये यासाठी आम्ही जनतेची सेवा म्हणून देशसेवा करत आहोत आपण एक आदर्श नागरिक म्हणून आपला सहभाग वाढवला आहे अशा भावना व्यक्त केल्या.


मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक घनवट साहेब यांनी सर्वांना मार्गदर्शन केले त्यात त्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांना पोलीस प्रशासनाकडून माहितीची देवाण-घेवाण,संशयित व्यक्ती किंवा वस्तूंची माहिती, संशयितांची रेखाचित्रे,गुन्ह्यांबाबतची माहिती, पेट्रोलिंग दरम्यानची माहिती, हरवलेली वस्तू शोधणे, गुन्हा उघड होण्यासंबंधी,वाहतूक सुरळीत करण्यासाठी तसेच बंदोबस्तात मदत..इ विषयक प्रशिक्षण तसेच कोणत्या गोष्टींवर लक्ष ठेवले पाहिजे मार्गदर्शन केल्यास आणि रात्रीच्या वेळी सुरक्षा रक्षकांना गस्तीचे प्रात्यक्षिक दिल्यास गुन्ह्याचे प्रमाण रोखण्यास मदत होईल.जे रक्षक भक्षक म्हणून काम करतात असे परप्रांतीय आणि गुन्हेगार पार्श्वभूमीचे रक्षकांवर आळा बसेल. सुरक्षा रक्षक संस्थेना योग्यती स्थानिक पोलीस स्टेशनची मदत मिळेल.


मा मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक नलावडे साहेब यांनी या उपक्रमा बाबत सुरक्षा विभागाकडून २४ तास माझे सहकारी अधिकारी उपलब्ध होतील आणि भविष्यकाळात पोलीस प्रायव्हेट सिक्युरिटी पार्टनरशीप प्रोग्रॅम पी-४ या उपक्रमाच्या माध्यमातून आणखी मोठ्या प्रमाणावर सुरक्षा विभाग कडून सुरक्षित करण्यावर भर दिला जाईल आणि जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था सांभाळण्याकरीता नागरिकांची जारुकता आणि सहकार्याची अपेक्षा राहील त्यासाठी प्रत्येक सुरक्षा रक्षक संस्थेच्या मालकांनी शासनाच्या नियमा प्रमाणे काम करताना जनतेची सेवा करावी पोलिस प्रशासन आपल्या पाठीशी आहे तसेच सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन सर्वांची मने जिंकली व या पुढे कोणत्याही मालकांना काहीही गरज भासल्यास आम्ही शंकेचे आणि समश्येचे निराकरण करण्यास सदैव तयार आहोत..


मा.अनिल लाबांते पोलीस उप-अधीक्षक यांनी आपल्या मार्गदर्शनात खाजगी सुरक्षा रक्षक ज्या ठिकाणी काम करतात त्यांनी पोलिसांचे पोलीस मित्र म्हणून काम केल्यास मोठ्या प्रमाणावर गुन्ह्यांवर आळा बसू शकतो सर्व मालकांना कायदेशीर बाबी समजावून सांगून या उपक्रमाचे महत्व पटवून दिले. विनापरवाना सिक्युरिटी एजेन्सी चालवतात अशा चालक व मालकांवर पसारा २००५ नुसार कायदेशीर कारवाई केली जाईल.


२६/११ च्या हल्ल्यातील शहीद झालेल्या सर्व पोलीस अधिकारी आणि नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सुरक्षा विभागाकडून उपस्थितीचे आणि सर्व पोलीस अधिकाऱ्याचे शीतल राउत यांच्या वतीने आभार मानण्यात आले.