Home गुन्हा बेकायदा शस्त्र परवानाधारक बाळगणाऱ्याला पुणे पोलिसांनी केली अटक

बेकायदा शस्त्र परवानाधारक बाळगणाऱ्याला पुणे पोलिसांनी केली अटक

0


पुणे : परवेज शेख , पुणे शहरात बेकायदेशीरपणे शस्त्र परवाना नसताना शस्त्र परवानाधारक राजेंद्र भिंताडे व परवान्यात वाढ करणारे कनिष्ठ लिपिक अमर पवार यांना पोलिसांनी अटक केली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस आयुक्तालयातील शस्त्र परवाना शाखेत नेमणुकीस असलेले कनिष्ठ लिपिक अमर पवार याने शस्त्र परवानाधारक भिंताडे यांच्याशी संगनमत करून भिंताडे यांनी पवाराना २५ हजाराचे प्रलोभन देऊन अमर पवार यांनी स्वत:च्या आर्थिक फायद्याकरता बेकायदा शस्त्र परवाना क्षेत्रवाढ करणे हे पदीय कर्तव्य नसतानाही भिंताडे यांच्या शस्त्र परवान्यावर खाडाखोड करून भारतभर क्षेत्र परवान्याची नोंद केली व पोलिस अभिलेखावर खाडाखोड करून नोंद बनावट केली आहे. अशा प्रकारे बनावट व्याप्ती केलेला परवाना भिंताडेने खरा म्हणून वापरला असल्याने त्याच्याविरूद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
दोन्ही आरोपीना अटक केली असून बंडगार्डनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरूण वायकर पुढील तपास करीत आहेत.