Home ताज्या बातम्या बेपत्ता असलेली अल्पवयीन मुलगी नातेवाईकांबरोबर सीसीटीव्हीत कैद

बेपत्ता असलेली अल्पवयीन मुलगी नातेवाईकांबरोबर सीसीटीव्हीत कैद

0

रायगड : डीआयजी निशिकांत मोरे यांच्यावर विनयभंगाचा आरोप लावलेली अल्पवयीन मुलगी गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता आहे. या प्रकरणाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असलेली सुसाईड नोट ठेवून ती गेली होती. मात्र आता एका रेल्वे स्थानकावर ती आपल्या नातेवाईकाबरोबर प्रवास करीत असल्याचा सीसीटीव्ही मिळाला आहे. अल्पवयीन मुलगी आपल्या ओळखीच्या व्यक्तीबरोबर उत्तर प्रदेशला गेली असल्याचे पोलीसांना सीसीटीव्हीतून कळाले आहे. सीसीटीव्ही समोर आल्याने यात निशिकांत मोरे यांचा कोणताही हात नसल्याचे त्यांच्या पत्नीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. DIG असलेल्या मोरे यांना नाहक बदनाम केले जात असून त्यांच्या वर खोटी विनयभंगाची केस लावली आहे. अल्पवयीन मुलगी स्वता आपल्या ओळखीच्या व्यक्ती बरोबर जात असल्याने तिला गायब करून यात निशिकांत मोरे यांना फसविण्याचा कट मुलीच्या वडीलांनी केला असल्याचा आरोप निशीका मोरे यांनी केलाय. मुलीच्या वडिलांकडे असलेले आपले पैसे मागितले असता विनयभंगाची तक्रार केल्याचा खुलासा मोरे यांच्या पत्नीने केला.