Home मनोरंजन बेफाम

बेफाम

0
बेफाम

[ad_1]

प्रत्येक गोष्टीचा, कथेचा, चित्रपटाचा स्वतःचा वेग आणि प्रवाह असतो. प्रेक्षकाला किंवा वाचकाला त्या कथेत वा सिनेमात गुंतवून ठेवण्यासाठी हा प्रवाह महत्त्वाचा असतो. हा प्रवाहच दिशाहीन असेल; तर तो चित्रपट पाहणं कंटाळवाणं होतं. कोणत्याही चित्रपटाचा पहिला आणि मूलभूत उद्देश असतो प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचा; पण चित्रपटाच्या कथानकाच्या प्रेमात पडून दिग्दर्शकानं त्याच्या दिग्दर्शकीय संस्कारांकडे दुर्लक्ष केलं, तर प्रकरण बेफाम होऊन जातं. असंच काहीसं ‘बेफाम’ या चित्रपटाबाबत झालं आहे. त्याचं मर्म आणि क्लायमॅक्स रंजक आहे; पण पूर्वार्ध रटाळ झाल्यानं प्रेक्षक शेवटपर्यंत खुर्चीवर खिळून राहतील का? यात संभ्रम आहे. दिग्दर्शकीय पकड कमी असल्यानं तो दिशाहीन भासतो त्यामुळे सिनेमा परिणाम साधत नाही.

नावाप्रमाणे ही गोष्ट एका बेफाम वृत्तीच्या तरुणाची आहे. सिद्धार्थ () त्याच्या करिअरच्या शोधात आहे. त्याचे वडील डॉक्टर असल्यानं आपल्या मुलानंही डॉक्टरचं व्हावं, अशी त्यांची इच्छा असते. सिद्धार्थ मेडिकलची प्रवेश परीक्षा देतो; पण त्यात तो नापास होतो. सिद्धार्थला डॉक्टर व्हायचं नसतं. त्यानंतर तो सैन्यात जाण्यासाठी तयारी करतो. त्यासाठी तो शारीरिक मेहनतही घेतो; परंतु तिथंही त्याला प्रवेश मिळत नाही. तो विमा एजंट म्हणून नोकरी करू लागतो. या कामात त्याचं मन फारसं रमत नाही. शेवटी तो रेडिओ जॉकी म्हणून एका रेडिओ स्टेशनमध्ये नोकरी करायला लागतो. हे काम त्याला उत्तम पद्धतीनं करता येतं; पण पुन्हा काही कारणास्तव ते ही काम तो सोडतो. पुढे एका कामानिमित्त प्रवास करताना त्याच्या बसमध्ये बॉम्ब ब्लास्ट होतो. यात तो वाचतो; पण यात जखमी झालेल्यांची मदत करण्यासाठी सिद्धार्थ पुढे सरसावतो. आता तो कशी मदत करतो, कोणत्या संकटांना त्याला सामोरं जावं लागतं, त्याला त्याच्या करिअरचा योग्य मार्ग सापडतो का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं उत्तरार्धात आहेत. एका बेफाम तरुणाची व्यक्तिरेखा सिद्धार्थ चांदेकरनं उत्तम साकारली आहे. , यांनीही त्यांच्या भूमिका उत्तम निभावल्या आहेत. विशेष कौतुक करावं ते अभिनेते यांचं. त्यांच्या अभिनयात त्यांचा अनुभव सतत दिसतो. तांत्रिक बाबींवर चित्रपट ठिकठाक आहे. अमितराज आणि मंदार खरे यांचं संगीतही श्रवणीय आहे; परंतु चित्रपट दिग्दर्शकीय श्रेणीत गोंधळल्यामुळे तो त्याची उंची साध्य करण्यात कमी पडतो.

चौकट

बेफाम

निर्मिती ः अमोल कांगणे

दिग्दर्शक ः कृष्णा कांबळे

लेखन ः विद्यासागर अध्यापक

कलाकार ः सिद्धार्थ चांदेकर, सखी गोखले, विद्याधर जोशी, सीमा देशमुख

संगीत ः अमितराज, मंदार खरे

छायांकन ः प्रसाद भेंडे

संकलन ः राजेश राव

[ad_2]

Source link