Home गुन्हा बेवारस मृतदेहाच्या कपड्यावरील टेलरच्या टॅगवरून हत्येचा छडा

बेवारस मृतदेहाच्या कपड्यावरील टेलरच्या टॅगवरून हत्येचा छडा

पिंपरी चिंचवड पुणे : रमेश कांबळे

शर्ट आणि पॅन्ट वरील कंपनीचा अथवा टेलरचा टॅग हा तुमच्यासाठी एक ब्रँड असतो. पण याच टॅगने पिंपरी चिंचवड पोलिसांना एका बेवारस मृतदेहाच्या हत्येचा छडा लावलाय .
धक्कादायक बाब म्हणजे  पूर्वी बाल सुधार गृहात ओळख झालेल्या ,आणि हैद्राबाद येथून मुंबईला भाई बनायला निघालेल्या तीन अल्पवयीन मुलांनी ही हत्या केलीय . मयताच्या डोक्यात ,दोन वेळा दगड मारून ,हत्या केल्यानंतर, मयताच्या खिशातील ५०० रुपये आणि मोबाईल घेऊन ,मुंबईला पलायन केले.

बेवारस मयत हे सध्या राहणार भिवंडी मूळ सोलापुर येथील दत्तात्रय माचर्ला यांचं असल्याचं निष्पन्न झालं.पोलिसांना या  यशानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी आपला मोर्चा आरोपींच्या शोधाकडे वळविला.
कोणताही गुन्हा असो गुन्हेगार एक अशी चूक करतो जी त्यांना खाकी वर्दीच्या जाळ्यात अडकण्यास कारणीभूत ठरते . अगदी तसाच काही प्रकार घडला. एका आरोपींने मयताच्या फोनवरून त्याच्या वडिलांशी एकदाच संवाद साधला, आणि नातेवाईक आणि तांत्रिक विश्लेषण याची सांगड घालून या बालगुन्हेगारांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या . गुन्हे शाखा युनिट ५ च्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कौतुकास्पद कामगिरी केलीय.