Home ताज्या बातम्या बेशिस्त वाहनचालक व अल्पवयीन वाहनचालकांवर ट्रॅफीक पोलीसांची कारवाई…..

बेशिस्त वाहनचालक व अल्पवयीन वाहनचालकांवर ट्रॅफीक पोलीसांची कारवाई…..

0

कोळगाव : श्रीगोंदा शहरात तसेच काष्टी येथे श्रीगोंदा पोलिसांनी बेशिस्तपणे वाहन चालवणे, विना लायसन गाडी चालवणे, गाडीचे कागदपत्र नसणे, अल्पवयीन मुलास गाडी चालवण्यास देणे, दारू पिऊन गाडी चालवणे यांच्यावर सोमवार दि.२७ रोजी कारवाई करत ३२ हजार ६०० रुपये दंड वसुल केला. दि.२५ जानेवारी रोजी श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे १०१ वाहनावर कारवाई करत २१ हजार ४०० रुपये दंड आकारण्यात आला आहे. तसेच अशीच कारवाई श्रीगोंदा शहरातील पेडगाव चौकात सोमवार दि.२७ रोजी ५७ वाहनावर कारवाई करून ११ हजार २०० रूपये दंड आकारण्यात आला असुन त्यामध्ये अल्पवयीन मुलास गाडी चालवण्यास दिली म्हणुन त्यांच्या पालकावर मोटार वाहन कायदा कलम 5/180 प्रमाणे ३ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.या कारवाईमुळे श्रीगोंदा शहरातील सर्वसामान्य जनतेकडुन समाधान व्यक्त करण्यात येत आहे.केलेली कारवाई अपर पोलीस अधिक्षक सागर पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांचे मार्गदर्शनाखाली,पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, स.पो.नि.सतिष गावीत, स.पो.नि,विठ्ठल पाटील, स.पो.नि.रांजेद्र सानप, पो.स.ई अमित माळी, पो.कॉ.प्रताप देवकाते, पो.कॉ कुलदिप घोळवे, पो.कॉ.दादासाहेब टाके, पो.कॉ.रमाकांत परीट, पो.कॉ.अमोल कोतकर, पो.कॉ.अनिल साठे, पो.कॉ.गोकुळ इंगवले, पो.कॉ. रवी जाधव, पो.कॉ.समीर सय्यद यांनी केली

चौकट : –
बेशिस्तपणे वाहन चालवणे, विना लायसन गाडी चालवणे, गाडीचे कागदपत्र नसणे, अल्पवयीन मुलास गाडी चालवण्यास देणे, दारू पिवुन गाडी चालवणे विनाकारण कॉलेजचे कॅम्पसमध्ये फिरणे, अश्या बेशिस्त वाहनचालकावर कारवाई सतत चालु राहणार असून यापुढे अल्पवयीन मुलांना गाडी चालवण्यास देणे हे पालकांच्या चांगलेच अंगलट येणार असुन मोटार वाहन कायदा कलम 5/180 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत सदर गुन्हयात 3 महिने कारावासाची शिक्षा आहे. असे पो.नि दौलत जाधव यांनी सांगितले.